राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोलीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव ,बोधिसत्व, भारतरत्न, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कात्रटवार सभागृह गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रवीभाऊ वासेकर तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रा. राजेश भाऊ कात्रटवार,राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे, रा. काँ. पा. महिला जिल्हाध्यक्ष डॉ. सोनल ताई कोवे उपस्थित होत्या.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी गीताताई हिंगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व शोषित,वंचित दुर्बल घटकासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच रविभाऊ वासेकर यांनी बाबासाहेबांच्या विविध कार्याची महती विशद केली. या कार्यक्रमाचे संचालन रा. काँ. पा. महिला शहर अध्यक्ष उमाताई बनसोड यांनी केले तर प्रास्ताविक रा. काँ. पा. शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे यांनी केले. यावेळी रा. काँ. पा. महिला कार्याध्यक्षा सुषमाताई येवले , गडचिरोली तालुका अध्यक्ष रा.काँ.पा विवेक बाबनवाडे,
माजी नगराध्यक्ष न.प गडचिरोली प्रमोदभाऊ वैद्य , जिल्हा उपाध्यक्ष रा.काँ.पा फहिमभाई काझी, रा.काँ.पा पार्टी चे नेते सुनिलभाऊ डोगरा, रवींद्रभाऊ नैताम जिल्हा सचिव रा.काँ.पा कपिल बागडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा अमृता ईझनकर, सुवर्णाताई पवार,लोमेश्वरी वासेकर, दीपिकाताई खाडिलकर, विजयभाऊ धकाते से. नी. वनपाल बळवंतजी येवले,
प्रसादभाऊ पवार, नितीनभाऊ जेंगठे, गिरीशभाऊ खाडिलकर,अविभाऊ साळवे,चारूभाऊ पोहाणे, मयूर धकाते, किशोर गव्हारे, अजय कुकडकर,
अज्जूभाई शेख,छोटुभाऊ राऊत,
गणेश नैताम,प्रशांतभाऊ रच्चावार, रामदासभाऊ मंगरे, सुनीलभाऊ गोंगले व ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते




