*_सिंदोळा येथे ‘कबड्डी महासंग्राम’चा भव्य शुभारंभ.._*

51

*_सिंदोळा येथे ‘कबड्डी महासंग्राम’चा भव्य शुभारंभ.._*

——————————————

*मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते कबड्डी डे-नाईट स्पर्धेला उत्साहपूर्ण सुरुवात*

 

दि. ०७ डिसेंबर २०२५ | सावली (जि. चंद्रपूर)

 

सावली तालुक्यातील मौजा-सिंदोळा येथे श्री. सिद्धी विनायक युवा क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य डे-नाईट कबड्डी महासंग्राम स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फित कापून संपन्न झाला.

 

या उद्घाटन समारंभा प्रसंगी बोलताना डॉ. नेते म्हणाले—“खेळाडूंनी राष्ट्रभावना आणि प्रामाणिक खेळसंस्कृती जागृत ठेवत मैदानात उतरावे. माझ्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अनेक ठिकाणी विकासकामे केली. पाथरी येथे आदिवासी गोवारी समाजासाठी सभागृहाचे लोकार्पण झाले; देवटोकला पंधरा लाखांची मदत; हरांबा येथे व्यसनमुक्ती सभागृह; उपरी येथे गोटुल; तसेच व्याहाड बुज येथेही अनेक विकासकामे या सोबतच तालुक्यात अनेक विकासकामे — अशा विविध उपक्रमांद्वारे विकासाचा वेग कायम ठेवला आहे.”

 

पुढे बोलत सिंदोळा गावकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मन:पूर्वक आभार मानले.गावात प्रवेश होताच सिंदोळा ग्रामस्थांनी औक्षण, फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात केलेल्या स्वागताबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

खेळाडूंशी हस्तांदोलन करत “उत्तुंग खेळभावना, शिस्त आणि संघभावनेने खेळा,” अशा शब्दांत त्यांनी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.

*राष्ट्रगीताने स्पर्धेची सुरुवात*

कबड्डी सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी सर्वानी सावधान होत गायलेल्या मुखानी राष्ट्रगीताने मैदानात उपस्थित सर्वांच्या मनात राष्ट्रभावनेची प्रेरक लहर पसरली.

 

या भव्य कबड्डी कार्यक्रमाला प्रामुख्याने—भाजपा तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर,संचालक चंद्रपुर सीडीसीसी बँक तथा साथ फाऊंडेशन संस्थापक रोहितभाऊ बोम्मावार, धात्रक ब्रदर्स प्रॉपर्टी डीलर्सचे मालक आणि भाजपा कोषाध्यक्ष जितूभाऊ धात्रक,भाजपाचे ज्येष्ठ नेते देविदास बानबले,ता.महामंत्री सतीशभाऊ बोम्मावार,माजी पं.स. सभापती छायाताई शेंडे,सिनेफेम सप्पु दादा,सामाजिक नेते विनोद धोटे,सरपंच गीता चौधरी,पो.पा. प्रतिभा माहोरकर,माजी न.प. उपाध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले,ज्येष्ठ नेते लक्ष्मण घोटेकर, रवि गेडेकर, नरेश बाबनवाडे, किशोर घोटेकर, आनंद ठिकरे, विशाल वाढणकर, राजू कोडाप, बंडूजी उंदिरवाडे,तसेच सिंदोळा गावातील मान्यवर, नागरिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

डे-नाईट कबड्डी महासंग्रामामुळे सिंदोळा परिसरातील तरुण खेळाडूंना नवे व्यासपीठ मिळाले असून ग्रामीण क्रीडा संस्कृतीला नवचैतन्य मिळाल्याची भावना किशोर वाकुडकर, रोहितभाऊ बोम्मावार, जितुभाऊ धात्रक,देविदास बानबले, इत्यादींने मनोगतातून व्यक्त केली.