*मुरखळा माल येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती उत्साहात साजरी*
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथे आज दिनांक ८/१२/२०२५ रोज सोमवार ला श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती पदवीधर शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर यांचे अध्यक्षतेखाली,शाळेतील शिक्षक वृंद श्री अशोक जुवारे सर, श्री चंद्रकांत वेटे सर, श्री जगदीश कळाम सर,श्री राजकुमार कुळसंगे सर,गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री यादव बुरे,श्री मारोती गाडेमोडे,श्री रविंद्र सरपे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पुजन करुन व फोटो ला मालार्पण करुन करण्यात आली.याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन इयत्ता ७वी ची विद्यार्थिनी गुंजन सोमनकर ने केले तर आभार इयत्ता ७वी चा विद्यार्थी सोहम गाडेमोडे ने मानले.शेवटी कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करुन करण्यात आली.




