आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली
जिह्यात 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर सिकलसेल नियंत्रण सप्ताह राबवला जाणार
गडचिरोली 11:- राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर सिकलसेल नियंत्रण सप्ताह राबवला जाणार आहे, यामध्ये नियमित व विशेष गाव निहाय, शाळा निहाय आणि इतर स्तरावर लाभार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 43276 सिकलसेल वाहक आणि 2997 सिकल सेल ग्रस्त रुग्ण आहेत. यामध्ये सिकल सेल ग्रस्त रुग्णांचे सिकल सेल क्रायसिस, तीव्र रक्तक्षय व आवश्यक आरोग्य तपासणी साठी नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.
सिकलसेल ग्रस्त रुग्णांना क्रायसिस होऊ नये आणि वारंवार रक्त लावण्याची गरज पडू नये म्हणून हैड्रोक्सियूरिया हे औषध सर्व रुग्णांना सुरु करण्याचे ध्येय आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 2447 रुग्णांना हैड्रोक्सियूरिया हे औषध सुरु केले असून त्यांच्या आरोग्य उत्कृष्ट असा बदल झाला आहे . व्यतिरिक्त जिल्ह्यात सर्व गरोदर स्त्रियांची प्रसूतीदरम्यान सिकल सेल तपासणी आणि ज्या स्त्रिया वाहक किवा रुग्ण आढळल्यास त्यांच्या पतींची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. जेणेकरून सिकलसेल असलेले जोडप्याचे 12 आठवड्याच्या आत गर्भजल चाचणी करून होणाऱ्या आपत्य हे सिकल सेल रुग्ण तर नाही हे जाणून घेता येते व ते जोडप्यांना गर्भपाथासाठी समुपदेशन करून टाळता पण येते. या साठी जिल्ह्यात संकल्प फौंडेशन आणि क्र्सना डॅग्नोस्टिकस कार्यरत आहेत.
ऑक्टों 2018 पासून जिल्ह्यात एकूण 19471 गरोदर स्त्रियांची तपासणी करण्यात अली आहे. त्या पैकी 191 स्त्रिया या सिकल सेल वाहक म्हणुन व 75 जोडपी हे दोन्ही वाहक असल्याचे आढळले व अश्या सर्व 75 स्त्रियांची गर्भजल चाचणी करण्यात अली आहे . या 75 पैकी 12 स्त्रियाच तपासणीत होणारे अपत्य हे सिकल सेल रुग्ण असेल असे आढळून आले आणि त्या पैकी 12 जोडप्यांनाही होणारे अपत्य सिकल रुग्ण होऊ नये व त्यानी आयुष्यभर यातना सोसू नये म्हून वैद्यकीय रित्या गर्भपात केले आहे. याच अनुषंगाने जिह्ल्यात नवीन जन्माला येणार बाळ सिकलसेल आहे किवा नाही हे जाणून घेण्यासाठी सर्व आरोग्य संस्था वर सिकलसेल वाहक असलेलं जोडप्याची गर्भजल तपासणी हि सुरु करण्यात येत आहे.
तसेच नवजात बालकाला सिकल सेल आजार तर नाही या साठी शासनाच्या निर्देशानुसार नवजात बालकाचे जन्माच्या 72 तासामध्ये तपासणी करण्यात येत आहे. हि तपासणी हिंद लॅब मार्फत प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर सुरु करण्यात येत आहे. सन 2023 पासून एकूण 18023 नवजात बालकांची तपासणी करण्यात आली आहे आणि येत्या काळात सर्वच नवजात बालकाची तपासणी प्रत्येक आरोग्य संस्थांवर करण्यात येईल असे मा मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले.
तसेच सिकलसेल हे आजार पुढच्या पिढीत होऊ नये म्हणुन लग्नापूर्वी तपासणी आणि सिकलसेल आजाराच्या वाहकांचे लग्न होऊ नये म्हणुन प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर आरोग्य कर्मचारी हे समुपदेशन करत आहेत. उपकेंद्र स्तरावर पेशंट सपोर्ट ग्रुप हे स्थापन करण्यात आला आहे जेणेकरून सर्व सिकल सेल वाहक आणि रुग्ण व्यक्तीचा नियम औषदाशीत, आरोग्य तपासणीसाठी आणि समुपदेशनासाठी पाठपुरावा घेण्यात येईल. जिल्ह्यात सिकलसेल चे नवीन रुग्ण होऊन नये व आहेत त्या रुग्णांना नियमित आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा आरोग्य विभाग हे तत्पर आहे. हे कार्यक्रम राबविण्यासाठी व कार्यक्रमाच्या सनियंत्रांसाठी PATH आरोग्य विभागासोबत कार्यरत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद गडचिरोली





