*_मुरमाडी येथे जय बजरंगबली क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य खुली कबड्डी स्पर्धेचा मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न…_*
मुरमाडी | ता.–जि. गडचिरोली | दि. २२ डिसेंबर २०२५
मौजा- मुरमाडी येथे जय बजरंगबली युवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे स्व. पुरुषोत्तम पाटील कोहपरे यांच्या विस्तीर्ण पटांगणावर या रंगतदार कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फीत कापून जल्लोषात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले,
“कबड्डी हा केवळ खेळ नसून तो शारीरिक तंदुरुस्ती, चपळता आणि संघभावना वाढवणारा सर्वोत्तम व्यायाम आहे. आज कबड्डी हा खेळ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय खेळ असून आता हळुहळु ग्रामीण भागातही लोकप्रिय होत आहे.कबड्डी हा खेळ ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध करून देणारा आहे.”
मुरमाडी गावात आयोजित या स्पर्धेमुळे क्रीडा संस्कृतीला नवे चैतन्य मिळाले असून, ग्रामीण खेळांना चालना देणारा आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
“कबड्डी खेळताना पंचांचा निर्णय अंतिम मानून, उत्तुंग खेळभावना, शिस्त आणि एकजुटीने खेळावे. गावातील अडचणी समजून घेऊन त्या निश्चितपणे सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू,” असे आश्वासनही मा.खा. डॉ. नेते यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी मैदानात उतरलेल्या खेळाडूंशी हस्तांदोलन करत त्यांचे मनोबल वाढवले व त्यांच्या उज्ज्वल क्रीडा भवितव्याला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. देवरावजी होळी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सरपंच भोगेश्वर कोडाप यांच्यासह नवनाथ ऊके, विवेक खेवले, मनोहर पा. भोयर, अशोक गावडे, सचिन भुसारी, माधव चौधरी, गणेश दहेलकर, यादव चौधरी, दीपक कोहपरे, दिलीप कोहपरे, राजू भोयर, अरविंद भुसारी, सत्यवान उरकुडे, फिरोज कोहपरे आदी मान्यवर उपस्थित होते.




