*सुभाषग्राम ग्रामपंचायत येथील घरकुलधारकांना रेती घाट उपलब्ध करून द्यावे* *- राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली,*
दिनांक 23 डिसेंबर 2025 चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम ग्रामपंचायत अंतर्गत मौजा नरेंद्रपूर ठाकूरनगर. तुंबडी येथील घरकुलधारकांना रेती उपसा करण्यासाठी घाट उपलब्ध न झाल्याने येथील सर्वसामान्य गोरगरीब घरकुल धारक जनतेला खूप त्रास सहन करावा लागत होता तसेच डबल किंमत मोजून रेती घ्यावी लागत होती या सर्व विषयाची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी येथील तहसीलदार घारुडे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आले व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार घारुडे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच तालुका प्रशासनाच्या वतीने येथील घरकुलधारकांना तुंबडी रेती घाट उपलब्ध करून देन्यात येईल असे प्रतिपादन केले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर कुंडू, तालुका सचिव संतोष बुरांडे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




