*विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा-राजे अंब्रीशराव आत्राम*
*53वा जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.*
*अहेरी:-* तालुक्यातील वांगेपल्ली येथे 53व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यात माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते विविध गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रथम,द्वितीय,तृतीय विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण आणि संशोधनात्मक प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
आज देशात नवीन तंत्रज्ञान,आणि आधुनिक नवनवीन बदल फक्त या विज्ञानामुळे शक्य होत आहे.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा,या उद्देशाने असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत राजे अंब्रीशराव आत्राम त्यांनी यावेळी व्यक्त केले.तसेच विद्यार्थ्यासाठी संशोधन व प्रयोग करण्यासाठी आधुनिक विज्ञान प्रयोग शाळेची गरज आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांचे कडून ते मंजूर करण्यासाठी प्रयत्न करून ते मिळवून घेणार अशी ग्वाही यावेळी राजे साहेबांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी आमदार दीपक आत्राम,शिक्षणाधिकारी माध्यमिक भुसे साहेब,प्राथमिक शिक्षणाधिकारी बच्चाव साहेब,वैभव बारेकर साहेब,उपशिक्षणाधिकारी गेडाम साहेब, परसा मॅडम,गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार साहेब,नाकाडे साहेब तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व वरिष्ठ व तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
जिल्ह्यातील विविध शाळेची शिक्षक,विद्यार्थी,पालक तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.






