Home गडचिरोली *माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत ‘मन की बात’ कार्यक्रमाचा...

*माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १३४ वा भाग उत्साहात संपन्न*

7

*माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १३४ वा भाग उत्साहात संपन्न*

गडचिरोली, दि. ३१ मे २०२६ :

देशाचे लोकप्रिय, लाडके आणि यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या बहुचर्चित ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १३४ व्या भागाचे सामूहिक श्रवण आज गडचिरोली येथील शाहूनगर परिसरातील बूथ क्र. १०१ येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमास किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीनजी कोडवते, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश विश्रोजवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मन की बात’च्या १३४ व्या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील विविध प्रेरणादायी विषयांवर संवाद साधला. यामध्ये भारतीय युवा शक्तीची असामान्य प्रतिभा, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा क्षेत्रातील विक्रम, झारखंडमधील युवा खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी, १०० मीटर धावण्यातील राष्ट्रीय विक्रम, ‘लंगडा’ आंब्याची वैशिष्ट्ये, समाजसेवेसाठी मोठ्या साधनांची नव्हे तर मोठ्या मनाची आवश्यकता, देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचे योगदान तसेच उष्णतेच्या तीव्र लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाची काळजी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता.

पंतप्रधानांनी नागरिकांना उष्माघातापासून बचावासाठी शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच उन्हाळ्यात पुरेशा प्रमाणात पाणी व इतर तरल पदार्थांचे सेवन करून आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला.

उपस्थितांनी हा कार्यक्रम अत्यंत लक्षपूर्वक ऐकला व पंतप्रधानांनी मांडलेल्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी मन कि बात हा कार्यक्रम पाहत माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, “‘मन की बात’ हा केवळ एक रेडिओ कार्यक्रम नसून देशातील सामान्य नागरिकांना प्रेरणा देणारा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी होण्याचा संदेश देणारा प्रभावी संवादाचा मंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असून समाजातील प्रत्येक घटकाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य या कार्यक्रमातून होत आहे.”

तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना पंतप्रधानांच्या विचारांचा प्रसार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रत्येक बूथवर ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे कार्य करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांनी मांडलेल्या विविध विषयांवर चर्चा केली. राष्ट्रहित, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण आणि जनजागृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन बूथ क्र. १०१ च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या संकल्पनेला अधिक बळ देणारा ‘मन की बात’ कार्यक्रम गडचिरोलीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Don`t copy text!