विविध दारुच्या गुन्ह्रातील एकूण 19,67,730/- रुपयांचा जप्त मुद्देमाल करण्यात आला नष्ट
* एकुण 372 गुन्ह्रांमधील मुद्देमाल देसाईगंज पोलीसांकडून नष्ट
गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या दारुची वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे आदेशान्वये जिल्ह्रातील अवैध दारु विक्री करणायांवर कठोर कार्यवाही केली जात असते. त्यानुसार विविध पोस्टे येथे दाखल गुन्ह्रांमध्ये जप्त मुद्देमाल हा नाशवंत असल्याने तसेच नवीन कारवार्इंदरम्यान देखील मुद्देमाल जप्त होत असल्याने जागे अभावी दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्देमाल जतन करुन ठेवणे अडचणीचे ठरत असते. पोस्टे देसाईगंज येथील सन 2023 ते 2025 या कालावधीतील दाखल एकूण 372 गुन्हयांमधील महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल दिनांक 06/01/2026 रोजी नष्ट करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे आहे की, मा. न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय देसाईगंज, जि. गडचिरोली यांचे परवानगीने दिनांक 06/01/2026 रोजी पोस्टे देसाईगंजचे पोलीस निरीक्षक श्री. अजय जगताप यांच्या नेतृत्वात राज्य उत्पादक शुल्क, भरारी पथक गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. शुभम चौधरी यांच्यासह पोस्टे देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्रांतील जप्त मुद्येमाल नष्ट केला. ज्यात 1) विदेशी दारुच्या 180 मिलीच्या 402 नग बॉटल 2) विदेशी दारुच्या 2 लिटर मापाच्या 12 नग प्लॉस्टीक बॉटल 3) विदेशी दारुच्या 90 मिलीच्या 110 नग बॉटल 4) देशी दारु 180 मीली मापाच्या 04 बॉटल 5) देशी दारू 90 मिलीच्या 20916 नग बॉटल 6) 500 मिली मापाचे बिअरचे 82 टिनाचे कॅन 7) 300 मिली मापाचे बियरच्या 07 नग बॉटल याप्रमाणे एकुण 19,67,730/- (अक्षरी:- एकोणविस लाख सदुसष्ठ हजार सातशे तीस) रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जेसीबि व रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आला. काचेचा चुरा व प्लास्टीकच्या चेपलेल्या बॉटल जेसीबीच्या सहाय्याने खड¬ात टाकून खड्डा पुर्ववत बुजविण्यात आला. सदर मुद्येमालाची विल्हेवाट लावताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पुर्णपणे दक्षता घेण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंजचे प्रभारी अधिकारी पोनि. अजय जगताप यांच्या नेतृत्वात श्रेणीपोउपनि. दुर्योधन सरपे, पोहवा/राजेंद्र मोहुर्ले, पोअं/शैलेश तोरपकरवार, पोअं/चिंतामण पिल्लारे, मपोअं/मिनाक्षी तोडासे, मपोअं/श्रध्दाप्रिया वंजारी यांनी पार पाडली.






