Home Breaking News *मनरेगा बचाव संग्राम अंतर्गत गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे शिवणी येथे निषेध आंदोलन*

*मनरेगा बचाव संग्राम अंतर्गत गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे शिवणी येथे निषेध आंदोलन*

187

*मनरेगा बचाव संग्राम अंतर्गत गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे शिवणी येथे निषेध आंदोलन*

 

*केंद्र सरकारने १०० टक्के अनुदानासह मनरेगा योजना पूर्ववत सुरू ठेवावी* –

जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी

 

गडचिरोली ::

भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही जनतेच्या जीवनाधार योजना असताना, भाजप सरकारने ती मोडीत काढून तिच्या जागी VB RAM G ही नवी योजना लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील कोट्यवधी कष्टकरी नागरिकांचा रोजगार हिरावला जाणार असून ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या लोकविरोधी, शेतकरी-मजूर विरोधी निर्णयाचा तीव्र निषेध करण्यासाठी तसेच मनरेगा योजना जुन्याच पद्धतीने, केंद्र सरकारच्या १०० टक्के अनुदानासह तात्काळ सुरू करण्यात यावी या ठोस मागणीसाठी “मनरेगा बचाव संग्राम” अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवणी येथे मनरेगा अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर उतरून भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.

यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदिवासी विभागाच्या राष्ट्रीय सचिव कुसुमताई आलाम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक श्रीकांत देशमुख, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, पंचायत राज सेल जिल्हाध्यक्ष नरेंद्र डोंगरे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, रोजगार सेल कार्याध्यक्ष सौ. पुष्पलताताई कुमरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, सहकार सेल अध्यक्ष अब्दुल भाई पंजवानी, दिवाकर निसार, ढीवरू मेश्राम, श्रीनिवास ताटपल्लीवार, उत्तम ठाकरे, गौरव येणप्रेड्डीवार, अनिकेत राऊत, जावेद खान, सौ. कविता उराडे, सौ. रीता गोवर्धन, सौ. शितल ठवरे, सौ. तनुजा कुमरे, सौ. मालता पुळो, दादा पाटील बानबले, सुधीर बांबोळे, नीलकंठजी पेंदाम, भीमरावजी दुधे, मनोहर गेडाम, एकनाथ भोयर, रुपेश लोणारे, प्रल्हाद गेडाम, डंबाजी बावणे, देवराव कांबळी, लह भोयर, एकनाथ सिडाम, शालिकराव चौधरी, वसंत कावळे, केवळ गुरनुले, संदीप चौधरी, सुनिल भोयर, विकास देशमुख, मनोहर भोयर, परशुराम खोब्रागडे, शंकर गुरनुले, अशोक मारभते, सोनू गडपायले, नामदेव गुरनुले, मारोती चुधरी, अंबादास कावळे, रोशन मुनघाटे, रुपेश चौके, सुधाकर चापले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मनरेगा योजनेत काम करणारे कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, मनरेगा ही केवळ रोजगार योजना नसून ग्रामीण भारताचा जीवनाधार आहे. भाजप सरकारचा हा निर्णय गरीबविरोधी असून काँग्रेस पक्ष जनतेच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करीत राहील.*

Don`t copy text!