*’भारत नटराज-2026′ राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सावनेरातील ‘नृत्यअरंगम कला केंद्र’ च्या विद्यार्थ्यांना सुयश*
*’भारत नटराज-2026’* ही राष्ट्रीय नृत्य स्पर्धा 17 व 18 जानेवारी 2026 ला कामगार कल्याण सांस्कृतिक भवन रघुजी नगर,सक्करदरा, नागपुर येथे *अक्षय नृत्यसम्राट कला मंदिर द्वारा आयोजित करण्यात आली.*
यामधे भारतातील विविध शहरातून आलेल्या स्पर्धकांनी अनेक स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात स्पर्धकांमधे सावनेर नगरातील *नृत्यअरंगम सेंटर ऑफ़ परफॉर्मिंग आर्ट्स सावनेर* च्या विद्यार्थिनी विजयी ठरल्या.
ज्यामधे विविध स्पर्धांमधील शास्त्रीय भरतनाट्यम नृत्य श्रेणीत सावनेर नगरातील नृत्यअरंगम च्या *कु. परिनीता धीरज ठाकरे* हिने प्रथम पारितोषिक तसेच *कु.गार्गी प्रशांत पिसे* हिने द्वितीय पारितोषिक पटकावीले.
भारत नटराज या स्पर्धेच्या प्रमुख तसेच परिक्षक यांचे कडून विजेत्यांचे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या श्रेया बद्दल पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी ‘नृत्यअरंगम’ सावनेर चे त्यांचे नृत्य प्रशिक्षक श्री ऋषिकेश पोहनकर व श्री आकाश बरवड यांचे धन्यवाद मानले.






