Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत 115 आश्रम शाळांमधील विद्याथ्र्यांकरीता ‘वीर बाबुराव...

गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत 115 आश्रम शाळांमधील विद्याथ्र्यांकरीता ‘वीर बाबुराव शेडमाके’ सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

70

 

 

गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत 115 आश्रम शाळांमधील विद्याथ्र्यांकरीता ‘वीर बाबुराव शेडमाके’ सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

 

श्व् जिल्हाभरातील एकूण 24,807 विद्याथ्र्यांचा आज झालेल्या सामान्य ज्ञान अंतिम परीक्षेत सहभाग

श्व् अतिदुर्गम भागातील शालेय विद्याथ्र्यांच्या सामान्य ज्ञानात वृद्धीसाठी पाच महिन्यांपासून उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी

 

गडचिरोली जिल्ह्रातील बहुतांश विद्यार्थी हे दुर्गम-अतिदुर्गम भागात राहतात. त्यामुळे तेथील विद्याथ्र्यांना योग्य मार्गदर्शन व संधीचा अभाव आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणा­या विद्याथ्र्यांना स्पर्धा परीक्षेबद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामूळे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेत मागे पडू नये याकरीता तसेच शालेय विद्याथ्र्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी व त्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील आश्रम शाळा व समाज कल्याण विभागातील विद्याथ्र्यांकरीता PRAYAS-(POLICE REACHING OUT TO YOUTHS & STUDENTS) या उपक्रमाअंतर्गत ‘वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धेच्या’ सहाव्या टप्याची सुरुवात दिनांक 12 ऑगस्ट 2025 पासून करण्यात आली होती.

सदर स्पर्धा राबविण्याकरीता जिल्ह्रातील 115 शासकिय व निमशासकिय आश्रम शाळांमधील प्रत्येकी 01 समन्वयक शिक्षक व आश्रम शाळा ज्या पोस्टे/उपपोस्टे/पोंमके हद्दीमधील आहे तेथील 01 समन्वयक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना PRAYAS (सामान्य ज्ञान) व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन या ग्रुपमध्ये समाविष्ट केले होते. सदर उपक्रमादरम्यान गेल्या पाच महिन्यांपासून आश्रम शाळांना व्हॉट्सअॅपव्दारे रोज 10 प्रश्न पाठविण्यात येत होते व आश्रम शाळेतील समन्वय शिक्षक दैनंदिन परिपाठामध्ये विद्याथ्र्यांना प्रश्न विचारुन त्यांची उत्तरे स्पष्टीकरणासह सांगत होते. अशा प्रकारे सदर उपक्रम 05 महिने चालविल्यानंतर आज दिनांक 22/01/2026 रोजी ‘वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान वार्षिक स्पर्धा’ उपक्रमाची अंतीम परीक्षा गडचिरोली जिल्ह्रातील 115 आश्रम शाळांमधील एकूण 24,807 विद्याथ्र्यांनी दिली. सदर परीक्षेमध्ये गुणवत्तापुर्व कामगिरी करणा­या विद्याथ्र्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे पोमकें गर्देवाडा हद्दीतील भगवंतराव आश्रम शाळा, गर्देवाडा येथील 20 विद्याथ्र्यांसह अतिदुर्गम भामरागड उपविभागातील एकूण 2,396 विद्याथ्र्यांनी सदर परीक्षेमध्ये सहभाग घेतला. यासोबतच अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांनी परीक्षेदरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली व एकलव्य रेसिडेन्शिअल इंग्लीश मिडीयम स्कुल, गडचिरोली (चामोर्शी) येथे भेट देऊन उपस्थित सर्व परीक्षार्थी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले.

 

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनखाली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी व सर्व समन्वयक अधिकारी, आश्रम शाळेतील सर्व मुख्याध्यापक व समन्वयक शिक्षक तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके, पोअं/रविंद्र कंकलवार व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

।।।।।।।।।

Don`t copy text!