Home Breaking News *महाराष्ट्रातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी,नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून होणार...

*महाराष्ट्रातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी,नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून होणार सुरू*

39

*महाराष्ट्रातील शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी,नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून होणार सुरू*

गडचिरोली – वृत्तवानी न्यूज

दरवर्षी विदर्भातील तापमान लक्षात घेता 23 ते 26 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र यावर्षी उन्हाळी सुट्ट्याबाबत शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे विदर्भातील शाळांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी 28 मार्च रोजी निर्गमित केलेल्या एका आदेशानुसार महाराष्ट्रात 15 जून ते 29 जून या कालावधीत सकाळी 7.00 ते11.45 या वेळेत चालवण्यात येतील.त्यानंतर 30 जूनपासून नियमित वेळापत्रक लागू होईल.असेही पत्रकात नमूद केले आहे.

मात्र दरवर्षी सुट्ट्यांचे नियोजन त्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी व शिक्षक संघटना करीत असतात.त्यामुळे सुट्ट्यांचे निर्धारण फेब्रुवारी महिन्यातच करण्यात आले असून त्यानुसार विदर्भातील शाळा 23 जूनपूर्वी सुरू करायच्या नाहीत असे म्हटले आहे.परिणामी उन्हाळी सुट्टीबाबत विदर्भातील शाळांमध्ये मोठ्याप्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे.

इतर मंडळाच्या शाळा त्यांच्या वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा महत्वाचे उपक्रम सुरू असल्यास संबंधित शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुट्टीबाबत निर्णय घेण्याची मुभा शिक्षण संचालकांनी दिला आहे.

Don`t copy text!