*भामरागडात शिवसेना (शिंदे गट )ओ.बी.सी. विभागाची बैठक संपन्न*
*तालुका कार्यकारिणीची करण्यात आली निवड*
भामरागड (गडचिरोली):
दिनांक 19 मे २०२६ रोजी भामरागड येथे शिवसेना ओ.बी.सी. विभाग,जिल्हा गडचिरोलीच्या वतीने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये सिरोंचाभामरागड तालुक्यातील संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी नवनवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी राजगोपाल सुल्वावार (जिल्हा संघटक,गडचिरोली),अरुण धुर्वे (माजी उपजिल्हा प्रमुख),बीरजू गेडाम (माजी जिल्हा संघटक), दिनेश मडावी तालुकाप्रमुख, खुशाल मडावी तालुका संघटक, प्रभाकर गावडे तालुका सचिव आणि शिवसेना ओ.बी.सी. विभाग जिल्हा प्रमुख नरेंद्र कंदिकुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत सर्वानुमते चर्चा करून सिरोंचाभामरागड तालुक्यातील सक्षम कार्यकर्त्यांकडे संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यावेळी ओ.बी.सी शिवसेना (शिंदे गट )तालुका प्रमुख रवींद्र गंगाराम पिपरे (मु.,ता. भामरागड)शहर प्रमुख किशोर डोकुजी गवारे (मु.पो.ता.भामरागड)
बैठकीदरम्यान अक्षय मंडळ, नरेश आत्राम, आशिष तलांडे प्रमोद मडावी शामराव तलांडे, के. ये. उसेंडी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व नेत्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.ओ.बी.सी.समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शिवसेनेचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या निवडी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे मत जिल्हा प्रमुख नरेंद्र कंदिकुरवार यांनी व्यक्त केले.
यावेळी तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्धार यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी भामरागड तालुक्यातील आरेवाडा, मेडपल्ली, दुब्बागुडा, जुव्वी, मन्नेराजाराम सारख्या खेड्यापाड्यात फिरून जनतेच्या समस्या जाणून घेण्यात आले असून सदर समस्या राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री डॉ. आशिषजी जयस्वाल साहेब यांचे समोर मांडणार आहे.






