Home Breaking News *‘स्नेहधर्म वृद्धाश्रम’चे उद्घाटन; वृद्धांना आणि बाळांना मिळणार मायेची छाया आणि हक्काचं घर!*

*‘स्नेहधर्म वृद्धाश्रम’चे उद्घाटन; वृद्धांना आणि बाळांना मिळणार मायेची छाया आणि हक्काचं घर!*

24

*‘स्नेहधर्म वृद्धाश्रम’चे उद्घाटन; वृद्धांना आणि बाळांना मिळणार मायेची छाया आणि हक्काचं घर!*

गडचिरोलीः दुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यातील किष्टापूर गावात मंगळवारी (३१ मार्च) रोजी ‘स्नेहधर्म वृद्धाश्रम’ उभं करण्यात आल्याने एकटेपणा सहन करणाऱ्या निराधार वृद्धांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू उमटणार आहे. स्नेहाधर्म बहुउद्देशीय संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाने सर्वांचे हृदय जिंकले असून, वृद्धांच्या जीवनात नवे उजेड भरला जाणार आहे. विशेष म्हणजे अनाथ, त्रासग्रस्त, विकलांग, गरीब, तसेच पालकांपासून दूर राहणाऱ्या लहान मुलांच्या आश्रयासाठी देखील बाळाश्रम उभारण्यात आला आहे.

माजी मंत्री व आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या मायेच्या सौम्य निवासाची सुरुवात झाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी साकारलेल्या या आश्रयस्थलीत श्रीमती तनुश्रीताई आत्राम (अध्यक्षा व सिनेट सदस्या), किस्किंदराव बाबा आत्राम (उपाध्यक्ष), रामेश्वरबाबा आत्राम (सचिव), सुवर्णाताई जगन्नाथराव सडमेक (कोषाध्यक्षा), पद्मिनी नारायणरावबाबा आत्राम (सदस्या), जगन्नाथराव दामोधर सडमेक व नारायणरावबाबा हरिश्चंद्रराव आत्राम यांच्या दूरदृष्टीने वृद्धांसाठी स्वर्गसदृश वातावरण रचले गेले आहे. अहेरीसारख्या दुर्गम भागात वृद्धांसाठी असा सेवाभावी प्रकल्प उभारल्याने नागरिकांच्या मनात समाधानाची लहर उसळली असून, या उपक्रमाची परिसरात कौतुक केले जात आहे.

या आनंददायी सोहळ्यात अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्रबाबा आत्राम, तहसीलदार बालाजी सोमवंशी, संवर्ग विकास अधिकारी गणेश चव्हाण, वनपरिक्षेत्राधिकारी नारायण इंगळे, हर्षवर्धन बाबा आत्राम, बबलू हकीम, चिंटू बाबा आत्राम, डॉ. मिताली ताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, रतन दुर्गे, नागेश मडावी, कारू अरोरा, सारिका गडपल्लीवार, पुष्पा अलोणे ताई, लक्ष्मीबाई कूळमेथे, ताजू कूळमेथे, चंद्रकांत बेझलवार व भाग्यश्री बेझलवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले.

Don`t copy text!