Home Breaking News महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष अनिल...

महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे

13

महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे

 

 

 

मुंबई /प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे उदगीर जिल्हा लातूर येथे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात डिजिटल मिडिया परिषदेच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन मुख्य विश्वस्त श्री एस.एम. देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली दर दोन वर्षांनी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात होत असते. या वर्षीचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन हे लातुर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी दिनांक 18 आणि 19 एप्रिल 2026 रोज होत आहे. या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन लोकमत माध्यम समुहाचे मुख्य संपादक श्री.राजेंद्रबाबु दर्डा यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. त्याच बरोबर उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांची थेट मुलाखत होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर मंत्री, खासदार,आमदार, सेलिब्रिटी त्याच बरोबर या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे बांधकाम राज्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्रीमंत.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,माजी मंत्री आ.संजय बनसोडे हे असणार आहेत. आपण आपल्या जिल्ह्यातील डिजिटल मिडीया परिषदेचे जिल्हाध्यक्ष या नात्याने सर्वांना या राष्ट्रीय अधिवेशनाची माहीती द्यावी. व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम सर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात येत्या 18 आणि 19 एप्रिल रोजी उदगीर येथे सहभागी व्हावे. अशा सुचना देऊन महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व जिल्ह्यांनी सहभागी होण्यासाठी जिल्हाध्यक्षांनी तयारी करावी असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

Don`t copy text!