, *”माणुसकीचा घास”*
* माणुसकीच्या या प्रवासात आपलाही सहभाग हवा…..*
*संजय मेश्राम यांचे आव्हान*

एक जानेवारी 2023 पासून अविरत सुरू असलेला *”माणुसकीचा घास”* या उपक्रमाच्या माध्यमातून आपण रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना एक वेळचे जेवण पुरवत आहोत. आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, प्रियजनांचे स्मृतिदिन किंवा आनंदाचे कोणतेही क्षण तुम्ही या उपक्रमाला समर्पित करून अनेकांची भूक शमविली आहे.
पण यावर्षी एप्रिल महिना पूर्णपणे रिक्त आहे. आतापर्यंत फक्त तीन ते चार दिवसाची नोंद झालेली आहे. रिकाम्या दिवशी माझ्याकडून अन्नदान असतेच पण समाजाचा सहभाग वाढला तर हा उपक्रम अधिक बळकट होईल.
*आपण काय करु शकता?*
° आपल्या घरातील खास दिवस (वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस) अन्नदानाने साजरी करा.
° प्रियजनांच्या स्मृतिप्रत्यर्थ गरजूंना जेवण द्या.
° केवळ मदतीची भावना म्हणूनही आपण एखाद्या दिवस प्रायोजित करू शकता.
*श्रमाचा तो घाम अन् कष्टाचे ते मोल,*
*माणुसकीचे या नात्याची महती आहे अनमोल,*
*तीन वर्षाच्या या प्रवासाचा प्रत्येकास वाटतो अभियान,*
*माणुसकीचा घास देणारे, “गडचिरोलीचे” तेच खरे सन्मान.*
तुमचा एक छोटासा वाटा कोणाच्यातरी चेहऱ्यावर समाधान आणू शकतो. आपणास विनंती आहे माणूसकीची ही साखळी तुटू देऊ नका.
*संपर्क*
*संजय मेश्राम 9423422404*
*उपक्रम:- माणुसकीचा घास.*
गरजूना अन्न पुरविणे हाच ध्यास.





