Home Breaking News भाकपाच्या पाठपुराव्याने गोरगुटाटा येथे ट्रान्सफॉर्मर बसला; नागरिकांचे काम मार्गी

भाकपाच्या पाठपुराव्याने गोरगुटाटा येथे ट्रान्सफॉर्मर बसला; नागरिकांचे काम मार्गी

29

भाकपाच्या पाठपुराव्याने गोरगुटाटा येथे ट्रान्सफॉर्मर बसला; नागरिकांचे काम मार्गी

 

एटापल्ली (प्रतिनिधी):

तालुक्यातील गट्टा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोरगुटाटा येथे जळालेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे निर्माण झालेली गंभीर वीज समस्या अखेर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपा) प्रभावी पाठपुराव्यामुळे मार्गी लागली आहे. भाकपाकडे मदतीसाठी धाव घेतलेल्या ग्रामस्थांची मागणी पूर्ण करत अखेर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला असून गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

 

ग्रामस्थांनी भाकपाकडे मागितली मदत, तात्काळ दखल

गेल्या अनेक दिवसांपासून वीज नसल्यामुळे त्रस्त झालेल्या गोरगुटाटा येथील नागरिकांनी भाकपाकडे मदतीची विनंती केली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला.

 

भाकपाच्या प्रयत्नांना यश

भाकपाने प्रशासनावर सातत्याने दबाव आणत ट्रान्सफॉर्मर तात्काळ बदलण्याची मागणी केली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत महावितरण विभागाने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला. त्यामुळे अनेक दिवस अंधारात असलेल्या गावात पुन्हा वीजपुरवठा सुरू झाला आहे.

 

नागरिकांकडून समाधान व्यक्त

नवीन ट्रान्सफॉर्मर बसवल्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी भाकपाचे आभार मानले आहेत. “आम्ही भाकपाकडे मदत मागितली आणि त्यांनी आमची समस्या तत्काळ सोडवली,” अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.

 

भाकपाची ठाम भूमिका

“गोरगुटाटा येथील नागरिकांना न्याय मिळवून देणे ही आमची जबाबदारी होती. भविष्यातही अशा कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी भाकपा नेहमी नागरिकांच्या पाठीशी उभी राहील,” असे कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले.

Don`t copy text!