Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवनिर्मित पोमकें बंगाडी येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले...

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवनिर्मित पोमकें बंगाडी येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

128

 

 

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नवनिर्मित पोमकें बंगाडी येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

 

* अतिदुर्गम बंगाडी व गुंडेनुर गावांतील एकूण 80 नागरिकांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी

* पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम

* आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान व पोलीस दलाच्या कार्याबद्दल करण्यात आली जनजागृती

 

गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्रामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दिनांक 19 मार्च 2026 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत उभारण्यात आलेल्या नवनिर्मित पोमके बंगाडी येथे आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली व सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीचे डॉ. धनंजय खंडागळे (फिजीशियन), महिला व बाल रुग्णालय गडचिरोली डॉ. मुकेश अत्यालगडे (बालरोग तज्ञ), ग्रामीण रुग्णालय चामोर्शीचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. प्रविण किलनाके (स्त्रीरोग तज्ञ), पोलीस रुग्णालय गडचिरोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशनी किरंगे तसेच 09 बटा. सीआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. मोहन यांचे नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

 

सदर मेळाव्यादरम्यान हद्दीतील सुमारे 80 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण 10 नागरिकांना आवश्यकतेनूसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस केलेली आहे. तसेच बालरोग तज्ञांकडून शालेय विद्याथ्र्यांची तपासणी आणि स्त्रीरोग तज्ञांकडून गरोदर माता व इतर महिलांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून आजपावेतो एकूण 191 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळ-जवळ एकूण 42,000 हजार पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण 05 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण 4,361 युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण 9,971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रात कार्यरत असतांना शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल, सी-60 जवानांच्या शौर्याबद्दल व नागरी कृती उपक्रमांबद्दल उपस्थित नागरिकांना विविध बॅनरच्या माध्यमातून माहिती देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.

 

सदर शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, कमांडंट सीआरपीएफ 09 बटा. श्री. शंभु कुमार, प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्मित पोमकें बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी पोउपनि. विजय आगलावे, पोउपनि. शुभम लांडगे, सिआरपीएफ 192 बटा. चे उप-कमाडंट श्री. महेश मिना, एसआरपीएफचे रा.पो.उपनि. यादव तांबोळी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

Don`t copy text!