राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गडचिरोलीत भीमजयंती उत्सवाचे आयोजन
इंदिरा गांधी चौकात १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
गडचिरोली, प्रतिनिधी :
भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने भीमजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १४ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार असून त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात येईल. तसेच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांवर आधारित त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ बेलखेडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अमोल कुळमेथे यांनी नागरिकांनी उत्साहात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.





