Home Breaking News *नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भाजप महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतिने गडचिरोली...

*नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भाजप महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतिने गडचिरोली शहरात 15 एप्रिल ला भव्य पदयात्रा रॅलीचे आयोजन.*

22

*नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ भाजप महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतिने गडचिरोली शहरात 15 एप्रिल ला भव्य पदयात्रा रॅलीचे आयोजन.*

 

*गडचिरोली :दि.१३ एप्रिल*

 

*भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी भव्य पदयात्रा रॅलीचे दि.१५ एप्रिल रोजी दुपारी:-०3=00 वाजता मा. आमदार श्री डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकत्रित होवुन शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गाने पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ ही रॅली आयोजित करण्यात येत आहे.*

 

*या भव्य पदयात्रेचे नेतृत्व मा.माजी खासदार श्री. अशोकजी नेते,मा.आमदार श्री. डाॅ. मिलिंद नरोटे.माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. रमेशजी बारसागडे,मा.आमदार क्रिष्णाभाऊ गजभे,सौ.प्रणोती निबोंळकर नगराध्यक्ष न.प.गडचिरोली,ओबिसी नेते बाबुरावजी कोहळे माजी जिल्हाध्यक्ष,माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे,माजी.जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,रमेश भुरसे प्रदेश सचिव किसान मोर्चा,सौ.रेखाताई डोळस प्रदेश सचिव महीला मोर्चा,जिल्हा महामंत्री श्री. प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांच्या प्रमुख नेतृत्वात करण्यात येणार आहे. रॅलीद्वारे महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि राजकीय सहभागाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.*

 

*भाजपा महिला आघाडीच्या व जिल्ह्यातील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तालुका महिला आघाडीं व सर्व आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ,शहरातील भाजपा पदाधिकारी व. कार्यकर्ते जिल्यातिल सर्व नगरपरिषद,नगरपंचायत मधिल अध्यक्ष,नगरसेविका,नगरसेवक व ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच व सदस्य,मोठ्या संख्येने महीला व नागरिक रॅलीमध्ये सहभागी होऊन या ऐतिहासिक विधेयकाला समर्थन द्यावे.*

*असे आवाहन सौ.योगिताताई पिपरे, जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी (माजी नगराध्यक्ष) तथा नगरसेविका नप गडचिरोली यांनी केले आहे.*

Don`t copy text!