Home Breaking News *15 एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य पदयात्रा रॅलीमध्ये सर्व पक्षातील महिलांनी व नागरिकांनी...

*15 एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य पदयात्रा रॅलीमध्ये सर्व पक्षातील महिलांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे:-सौ.योगिताताई पिपरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी गडचिरोली*

20

*15 एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य पदयात्रा रॅलीमध्ये सर्व पक्षातील महिलांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे:-सौ.योगिताताई पिपरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी गडचिरोली*

 

*गडचिरोली:-*

 

*महिलांना संसद व विधानसभा मध्ये 33 टक्के आरक्षण देणारे “नारीशक्ती वंदन” हे ऐतिहासिक विधेयक पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासमोर आले आहे. महिलांच्या सामर्थ्यावर ठेवलेला हा विश्वास लोकशाही अधिक समावेशक करणार आहे. हा विषय राजकारणाच्या पलीकडचा असून देशातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाचा आहे. नारीशक्ती वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ व मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदीं यांना धन्यवाद देण्याकरिता 15 एप्रिल रोजी होणाऱ्या भव्य पदयात्रा रॅलीमध्ये सर्व पक्षातील महिलांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन व निमंत्रण सौ. योगिताताई प्रमोद पिपरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाडी (माजी नगराध्यक्ष) तथा नगरसेविका नप गडचिरोली यांनी केले आहे.*

(*रॅली निघण्याचे स्थळ:- मा.आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे जनसंपर्क कार्यालय गडचिरोली*

*वेळ:- दुपारी ०३.०० वाजता*)

Don`t copy text!