Home Breaking News *आलापल्लीत आय्यप्पा स्वामी महापडीपूजा उत्साहात.*

*आलापल्लीत आय्यप्पा स्वामी महापडीपूजा उत्साहात.*

21

*आलापल्लीत आय्यप्पा स्वामी महापडीपूजा उत्साहात.*

 

*अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भक्तीपूर्ण उपस्थिती.*

 

 

*आलापल्ली:-* येथील आय्यप्पा स्वामी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जन्म नक्षत्र तिथीप्रमाणे महापडीपूजा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. या पवित्र कार्यक्रमास माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी उपस्थित राहून आय्यप्पा स्वामींचे दर्शन घेतले आणि विधिवत पूजा-अर्चा केली.मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार, भजन-कीर्तन आणि पारंपरिक विधींनी परिसर दुमदुमून गेला होता. याच भक्तिमय वातावरणात राजे साहेबांनी आय्यप्पा स्वामींच्या चरणी नतमस्तक होत गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या सुख-शांतीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

 

 

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आय्यप्पा स्वामींच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो, अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच उत्साह आणि उर्जा लाभली.या जन्म नक्षत्र महापडीपूजा कार्यक्रमास कुमार अवधेशराव बाबा आत्रामसह भाजपचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते तसेच आय्यप्पा स्वामींचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

आलापल्लीतील आय्यप्पा स्वामी मंदिरातील हा भव्य सोहळा भक्ती, परंपरा आणि एकात्मतेचे सुंदर दर्शन घडवणारा ठरला.

Don`t copy text!