Home Breaking News *‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा कांग्रेस पक्षाचा जाहीर निषेध*

*‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा कांग्रेस पक्षाचा जाहीर निषेध*

26

*‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा कांग्रेस पक्षाचा जाहीर निषेध*

 

*गडचिरोली:- दि. 4 एप्रिल*

 

*केंद्र सरकारने सादर केलेल्या ‘नारी शक्ती वंदन’ (महिला आरक्षण) विधेयकाला संसदेत विरोध करणाऱ्या काँग्रेस सह इतर विरोधी पक्षांच्या भूमिकेविरोधात गडचिरोलीत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.*

*’समस्त नारी शक्ती गडचिरोली’, भारतीय जनता युवा मोर्चा व महिला मोर्चाच्या वतीने स्थानिक शिवाजी महाविद्यालयासमोर हे आंदोलन पार पडले.*

*आंदोलनादरम्यान महिला पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विरोधी पक्षांच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. महिलांना राजकारणात समान प्रतिनिधित्व देणाऱ्या या विधेयकाला विरोध करणे म्हणजे नारी शक्तीचा अपमान असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.*

*या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष (माजी नगराध्यक्ष) तथा नगरसेविका, सौ.योगिताताई पिपरे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष सौ. प्रणोतीताई निंबोरकर, भाजपा जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षाताई शेडमाके,सौ. अर्चनाताई बोरकुटे श्रीमती प्रतिभाताई चौधरी सौ.लताताई लाटकर माजी नगरसेविका,युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री आकाश सातपुते,जिल्हा उपाध्यक्ष रजत वंजारी,शहर अध्यक्ष साई सिलमवार,युवती प्रमुख पायलताई कोडापे, युवा मोर्चा सचिव गायत्रीताई सोमनाकार आदी पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, युवती व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.*

*आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दणाणून गेला होता.“महिलांना सक्षम करणाऱ्या विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.केंद्र सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.*

Don`t copy text!