Home Breaking News महाराष्ट्र राज्याच्या कामगार संहिता अधिसुचना प्रसिध्द

महाराष्ट्र राज्याच्या कामगार संहिता अधिसुचना प्रसिध्द

24

महाराष्ट्र राज्याच्या कामगार संहिता अधिसुचना प्रसिध्द

 

 वेतन संहिता, २०१९.

क्रमांक सी ओ डब्ल्यू-०१२६/प्र. क्र. ०९/काम.७.- वेतन संहिता, २०१९ (२०१९ चा २९) याच्या कलम ६७ च्या पोट-कलम (१) व पोट-कलम (२) याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, आणि किमान वेतन अधिनियम, १९४८ (१९४८ चा ११) अन्वये केलेल्या महाराष्ट्र किमान वेतन नियम, १९६३ आणि वेतन प्रदान अधिनियम, १९३६ (१९३६ चा ४) अन्वये केलेल्या महाराष्ट्र वेतन प्रदान नियम, १९६३ यांचे अधिक्रमण करून, महाराष्ट्र शासनाने करण्याचे प्रस्तावित केलेले नियमांचे पुढील प्रारुप, त्यामुळे बाधित होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी, उक्त संहितेच्या कलम ६७ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे; आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, ही अधिसूचना, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवस समाप्त झाल्यानंतर, उक्त प्रारुप, महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल.

 औद्योगिक संबंध संहिता, २०२०.

क्र.. आयआरसी-०१२०२६/प्र.क्र.०६/कामगार-२. – औद्योगिक संबंध संहिता, २०२० (२०२० चा ३५) च्या कलम ९९ च्या उप-कलम (१) मधील तरतुदींनुसार तसेच त्या संदर्भातील इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या नियमांचा खालील मसुदा, औद्योगिक विवाद (महाराष्ट्र) नियम, १९५७, महाराष्ट्र औद्योगिक रोजगार (स्थायी आदेश) नियम, १९५९ आणि महाराष्ट्र कामगार संघ विनियम, १९२७ यांचे अधिक्रमण करून, प्रसिद्ध करण्यात येत आहे. कलम ९९ च्या उप-कलम (१) नुसार, या नियमांचा मसुदा सर्व संबंधित व्यक्तींना माहितीकरिता महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे; आणि असे कळविण्यात येते की, या अधिसूचनेच्या राजपत्रात प्रसिद्धीच्या तारखेपासून पंचेचाळीस दिवसांचा कालावधी संपल्यानंतर उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल.

 व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता, २०२०.

क्रमांकः- संकीर्ण-१०२६/प्र.क्र.१४/काम-१०. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता, (२०२० चा ३७) याच्या कलम १३३ व कलम १३५ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि त्याबाबतीत त्यास प्राधिकृत करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, आणि श्रमिक पत्रकार (सेवाशर्ती) अधिनियम, १९५५ (१९५५ चा ४५) या अन्वये केलेल्या श्रमिक पत्रकार (सेवाशर्ती) आणि संकीर्ण तरतुदी नियम, १९५७; मोटार वाहतूक कामगार अधिनियम, १९६१ (१९६१ चा २७) या अन्वये केलेल्या मोटार वाहतूक कामगार नियम, १९६२; बिडी व सिगार कामगार (रोजगाराच्या शर्ती) अधिनियम, १९६६ (१९६६ चा ६३) या अन्वये केलेल्या बिडी व सिगार कामगार (रोजगाराच्या शर्ती) नियम, १९६८; कंत्राटी कामगार (विनियमन व निर्मूलन) अधिनियम, १९७० (१९७० चा ३७) या अन्वये केलेल्या कंत्राटी कामगार (विनियमन व निर्मूलन) केंद्रीय नियम, १९७१; विक्री संवर्धन कर्मचारी (सेवाशर्ती) अधिनियम, १९७६ (१९७६ चा ११) या अन्वये केलेल्या विक्री संवर्धन कर्मचारी (सेवाशर्ती) नियम, १९७६; आंतरराज्य स्थलांतरित कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९७९ (१९७९ चा ३०) या अन्वये केलेल्या आंतरराज्य स्थलांतरित कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) केंद्रीय नियम, १९७९; चित्रपट कामगार व चित्रपट रंगभूमी कामगार (रोजगाराचे विनियमन) अधिनियम, १९८१ (१९८१ चा ५०) या अन्वये केलेल्या चित्रपट कामगार व चित्रपट रंगभूमी कामगार (रोजगाराचे विनियमन) नियम, १९८४ आणि इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ (१९९६ चा २७) या अन्वये केलेल्या इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे विनियमन व सेवाशर्ती) नियम, १९९८, यांचे अधिक्रमण करून त्याद्वारे बाधित होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी. उक्त संहितेच्या कलम १३३ च्या पोट-कलम (१) व कलम १३५ च्या पोट-कलम (१) यांद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत; आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये ही मसुदा अधिसूचना प्रसिध्द केल्याच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवस समाप्त झाल्यानंतर, उक्त प्रारूप, महाराष्ट्र शासनाकडून विचारात घेण्यात येईल.

कोणताही आक्षेप किंवा सूचना, कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी २०, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ किंवा ईमेल- mh.labourcodes.rules@gmail.com वर स्विकारण्यात येतील. व्यक्तीचे किंवा संस्थेचे नाव व पत्ता विनिर्दिष्ट करणारा स्तंभ (एक) आणि फेरबदल करण्याचे प्रस्तावित केलेले नियम किंवा पोट-नियम विनिर्दिष्ट करणारा स्तंभ (दोन) आणि दाखल करण्याचे प्रस्तावित केलेले सुधारित नियम किंवा पोट-नियम व त्याची कारणे विनिर्दिष्ट करणारा स्तंभ (तीन) अंतर्भूत असणाऱ्या प्रपत्रामध्ये आक्षेप व सूचना पाठविता येतील.

वरीलप्रमाणे अधिसूचना दिनांक २८/०४/२०२६ व ३०/०४/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. वरील तिनही कामगार अधिसूचना सरकारी कामगार अधिकारी, यांचे कार्यालय गडचिरोली येथे उपलब्ध आहे. तसेच कामगार विभागाच्या https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सबब अधिसूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून नमूद केलेला ४५ दिवसाच्या कालावधी समाप्त होण्यापूर्वी उक्त मसुद्याच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून प्राप्त झालेले आक्षेप व सूचना राज्य शासनाकडून विचारात घेण्यात येईल. असे सरकारी कामगार अधिकारी, गडचिरोली, कुलदिप प्र. भोलाने यांनी कळविले आहे.

0000

Don`t copy text!