Home Breaking News क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

18

क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

 

गडचिरोली,(जिमाका),दि.०७: जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता दि. 11 ते 20 मे 2026 पहिला टप्पा व दि. 21 ते 30 मे 2026 दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स एरिया, गडचिरोली, क्रीडा प्रबोधिनी, गडचिरोली व जिल्हा स्टेडीयम, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे सकाळी 5.30 ते 8.00 व सायंकाळी 5.30 ते 8.00 या कालावधीत शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबीरात 10 वर्षावरील सर्व मुलामुलींना सहभाग घेता येईल.

उपरोक्त प्रशिक्षण शिबीरात कुस्ती, व्हॉलीबाल, मैदानी, बॉक्सिंग, खो-खो, कबड्डी, बॉलबॅडमिंटन या खेळाचे प्रशिक्षण तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांकडून देण्यात येईल. उपरोक्त शिबीरात सहभाग घेण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात नाव नोंदणी दि. 08/05/2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत करणे आवश्यक आहे.

उपरोक्त शिबीरात गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू/विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.

0000

Don`t copy text!