*नवनिर्वाचित आमदार मा. प्रा. श्री. संजयजी भेंडे यांचा सत्कार व अभिनंदन समारंभ उत्साहात संपन्न.*
*नागपूर नागरिक सहकारी बँक लि. च्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन.*
*गडचिरोली | दि. १७ मे २०२६*
*नागपूर नागरिक सहकारी बँक लि.चे अध्यक्ष,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, कुशल संघटक, लोकप्रिय वक्ते, सामाजिक कार्यकर्ते मा. प्रा. श्री. संजयजी भेंडे यांची “महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य” म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी नागपूर नागरिक सहकारी बँक लि. च्या वतीने सत्कार व अभिनंदन समारंभाचे आयोजन दि.१७ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशन बैंकेट हॉल, वर्धा रोड, नागपूर येथे करण्यात आले होते.*
*या समारंभाला मा.श्री.इंजि. प्रमोदजी पिपरे संचालक,महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे तथा माजी सभापती न.प. गडचिरोली यांनी उपस्थित राहून मा.श्री. संजयजी भेंडे यांची “महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सदस्य” म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.*
*या सत्कार समारंभ कार्यक्रमाला मुख्यत: मा.ना.श्री.नितिनजी गडकरी केंद्रीय वाहतुक मंत्री,(भारत सरकार), मा.ना.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपुर जिल्हा, मा.आमदार श्री.प्रवीणजी दरेकर सत्तापक्ष नेता, विधानपरिषद तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या.पुणे,मा.श्री. ज्योतींद्र मेहता अध्यक्ष NUCFDC नवी दिल्ली उपस्थित होते.*





