Home Breaking News वांगेतुरी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा; माजी मंत्री अम्ब्रिशराव महाराज यांच्या समर्थकांचा बिनविरोध विजय

वांगेतुरी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा; माजी मंत्री अम्ब्रिशराव महाराज यांच्या समर्थकांचा बिनविरोध विजय

34

वांगेतुरी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा; माजी मंत्री अम्ब्रिशराव महाराज यांच्या समर्थकांचा बिनविरोध विजय

📍 एटापल्ली प्रतिनिधी :

तालुक्यातील ग्रामपंचायत वांगेतुरी येथे गुरुवार दि. 21 मे 2026 रोजी झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत माजी राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या समर्थकांनी बिनविरोध विजय मिळविला. या निवडीमुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायत वांगेतुरीच्या सरपंचपदी सौ. वनिता गोमजी कोवासी तर उपसरपंचपदी सौ. शैला रामसु कोवासी यांची सर्व सदस्यांच्या एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून श्री गणेश कोरसा, श्री सुरेश कोवासे व सौ. अनिता मठ्ठामी उपस्थित होते.

निवडीनंतर भारतीय जनता पार्टी गडचिरोलीतर्फे जिल्हा महामंत्री श्री प्रशांत भाऊ आत्राम यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री रैजु गावडे, श्री मिरवा गावडे, श्री दादाराव राजुरकर, श्री विकास तोडसाम (तालुकाध्यक्ष अहेरी), श्री श्रीनिवास मगडीवार, कु. मनीष ढाली, कु. आविष्कार गड्डमवार, कु. शुभम आत्राम, अजय ठाकरे, ग्रामसभा अध्यक्ष श्री पत्तु पोटावी, श्री किशोर कोवासी, श्री धर्मा कोरसा, श्री बुच्छा कोरसा, श्री मानसिंग मठ्ठामी, श्री शंकर कोवासे यांच्यासह डोड्डुर, पुस्कोटी, रेंगाटोला, तोडगट्टा, हिंदुर, बोदील टोला येथील नागरिक, भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!