Home गडचिरोली *चंद्रपूर येथील सहकार प्रशिक्षण केंद्राला इंजि. प्रमोदजी पिपरे यांची भेट* *समस्यांची...

*चंद्रपूर येथील सहकार प्रशिक्षण केंद्राला इंजि. प्रमोदजी पिपरे यांची भेट* *समस्यांची पाहणी; जागेच्या मालकी हक्क प्रक्रियेलाही गती*

10

*चंद्रपूर येथील सहकार प्रशिक्षण केंद्राला इंजि. प्रमोदजी पिपरे यांची भेट*

*समस्यांची पाहणी; जागेच्या मालकी हक्क प्रक्रियेलाही गती*

*गडचिरोली:- दि. 28 मे 2026*

*महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे द्वारा संचालित चंद्रपूर येथील सहकार प्रशिक्षण केंद्र तसेच चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्डला इंजि. प्रमोदजी पिपरे, संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे तथा माजी सभापती न.प. गडचिरोली यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशिक्षण केंद्रातील विविध विभागांची माहिती जाणून घेत तेथील समस्या व अडचणींचा आढावा घेतला.यावेळी चंद्रपूर येथील सहकार प्रशिक्षण केंद्राच्या जागेच्या मालकी हक्कासंदर्भातील प्रलंबित विषयांवरही चर्चा करण्यात आली.*
*महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार जागेचे निर्वेध मालकी हक्क प्राप्त करणे, अधिकृत शेतजमिनीतून बिगरशेती जमिनीत रूपांतर, जागेचा नकाशा (ले-आऊट) तयार करणे, भूखंडासंदर्भातील फेरफार काढणे तसेच शासकीय मोजणी करून चतु:सीमा निश्चित करणे आदी कामांसाठी उपसमिती गठीत करण्यात आली. या उपसमितीच्या अध्यक्षपदी इंजि. प्रमोदजी पिपरे यांची निवड करण्यात आली.*
*जागेच्या मालकी हक्क संबंधित प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असुन सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे.प्रशिक्षण केंद्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच विकासात्मक कामांना गती देण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी दिले.*
*दरम्यान,उपसमितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर व जिल्हा सहकारी बोर्ड चंद्रपूरच्या वतीने इंजि. प्रमोदजी पिपरे संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.*

*याप्रसंगी जिल्हा सहकारी बोर्ड चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. वसंतराव विधाते, संचालक श्री. विलासजी जोगी, नगरसेविका (माजी नगराध्यक्षा) सौ. योगिताताई पिपरे,उपप्राचार्य सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर श्री. बी. सी. फलके, जिल्हा सहकार विकास अधिकारी जिल्हा सहकारी बोर्ड चंद्रपूर श्री. एन. डी. पिंपळकर, प्राध्यापक सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर श्री. एस. व्ही. मोरे, जिल्हा सहकारी विकास अधिकारी जिल्हा सहकारी बोर्ड गडचिरोली श्री. पी. व्ही. तलमले, श्री. झाडे, श्री. नागमोते तसेच कर्मचारी उपस्थित होते.*

Don`t copy text!