Home Breaking News _*भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमांतर्गत...

_*भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन*_

11

_*भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन*_

गडचिरोली, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने ‘एक पेड़ माँ के नाम’ या विशेष उपक्रमांतर्गत कॅम्प एरिया हनुमान मंदिर परिसर, गडचिरोली येथे वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

पर्यावरण संवर्धन, हरित गडचिरोली आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत नागरिकांना वृक्षारोपणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धनाच्या पद्धती तसेच पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.

पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या ‘एक पेड़ माँ के नाम’ या प्रेरणादायी संकल्पनेचा उल्लेख करत प्रत्येक नागरिकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती सामाजिक बांधिलकी असल्याचेही नमूद केले.

कार्यक्रमात विविध प्रकारच्या रोपांचे वितरण करण्यात आले तसेच आगामी काळात शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संरक्षणासाठी सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, नगराध्यक्ष ॲड प्रणोतीताई निंबोरकर, शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, चंदू देवाडकर, शहर महामंत्री विनोद देवजवार, हर्षल गेडाम, सीमाताई कन्नमवार, अवंतिकाताई धंदरे, देवाडकर ताई प्रमुख्याने उपस्थित होते.

“एक पेड़ माँ के नाम” या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहर कटिबद्ध असून, हरित आणि स्वच्छ गडचिरोली घडविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Don`t copy text!