Home गडचिरोली *भाजपा चामोर्शी तालुका मंडळाची आढावा व नियोजनात्मक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*

*भाजपा चामोर्शी तालुका मंडळाची आढावा व नियोजनात्मक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*

30

*भाजपा चामोर्शी तालुका मंडळाची आढावा व नियोजनात्मक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*

 

*गडचिरोली | दि. 5 जून २०२६*

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या विश्वास, विकास व जनकल्याणकारी कारभाराची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुका मंडळाचीआढावा व नियोजनात्मक बैठक उत्साहात पार पडली.*

*प्रदेशाध्यक्ष मा. आमदार श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार आयोजित हि बैठक इंजि.प्रमोदजी पिपरे मंडळ प्रभारी चामोर्शी तालुका तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या.पुणे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष प्रा.रमेशजी बारसागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या चामोर्शी येथील कर्तव्य दक्ष क्र.2 जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली.बैठकीत आगामी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले.*

*बैठकीत जागतिक पर्यावरण दिन,आंतरराष्ट्रीय योग दिन,आपत्कालाच्या ५१ वर्षांच्या स्मृती,“एक पेड़ माँ के नाम”वृक्षारोपण अभियान,मन की बात कार्यक्रम,पदवीधर मतदार नोंदणी, S.I.R.,BLO सोबत घर चलो अभियान,स्वच्छता मोहीम, प्लास्टिक निर्मूलन, प्रत्येक बूथवर जनजागृती शिबिरे आयोजित करणे तसेच या कार्यक्रमाची माहिती सरल ऍप वर अपलोड करणे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.*

*बैठकीस तालुका अध्यक्ष श्रीमती रोशनीताई वरघंटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष भास्करजी भुर्रे, तालुका महामंत्री शेषरावजी कोहळे, तालुका महामंत्री वासुदेव चिचघरे, जेष्ठ नेते माणिक कोहळे,सोपान नैताम, खंडुसिंग खसावत, किशोर गटकोजवार,सतीश भांडेकर, जानुजी बोधलकर,यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

#BJPGadchiroli #ModiGovernment12Years #ViksitBharat #Gadchiroli #BJPMaharashtra

Don`t copy text!