Home Breaking News विदर्भातील शाळा सुरू होण्याची तारीख पुन्हा बदलली आता 30 जूनला होणार शाळा...

विदर्भातील शाळा सुरू होण्याची तारीख पुन्हा बदलली आता 30 जूनला होणार शाळा सुरू  विद्यार्थी,पालक, शिक्षक खुश

26

विदर्भातील शाळा सुरू होण्याची तारीख पुन्हा बदलली आता 30 जूनला होणार शाळा सुरू

विद्यार्थी,पालक, शिक्षक खुश

वृत्तवानी न्यूज

राज्यातील शाळा सुरू होण्याचा घोळ संपण्याचे नाव घेत नाही.महाराष्ट्रात 15 जून रोजी शाळा सुरू होण्याची तारीख जाहीर करण्यात आली. शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या. न्यायालयाचा निर्णय येण्या अगोदर शिक्षण विभागाने उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 22 जून रोजी सुरू करण्याचे आदेश काढले.मात्र न्यायालयाने विदर्भातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला.त्यामुळे शिक्षण संचालक यांनी 22 जून रोजी शाळा सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला 24 तास उलटत नाही.तोच न्यायालयांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून 30 जून रोजी शाळा सुरू करण्याचे कडक निर्देश दिले.या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Don`t copy text!