गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 15,65,180/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन दिनांक 10/06/2026 रोजी पोस्टे आरमोरी पोलीस पथकाने सापळा रचून अवैद्य देशी-विदेशी दारूची वाहतुक करणाया आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत असे आहे की, दिनांक 10/06/2026 रोजी सहायक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, इसम नामे सुनिल जिभकाटे रा. शेगाव टोली आरमोरी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली हा आपल्या साथीदाराच्या मदतीने चारचाकी वाहनाने बाहेर जिल्ह्रातून अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतूक करुन आरमोरी येथील बि.एस.एन.एल टॉवरजवळील त्याच्या नावाने असलेल्या ईलेक्ट्रीक सामान ठेवलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी व हातभट्टी मोहा दारूचा अवैधरित्या साठा करून ठेवलेला आहे. अशा मिळालेल्या माहितीवरुन सहायक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे व आरमोरी येथील पोलीस पथक यांनी सुनिल जिभकाटे याच्या गोदामाजवळ पाहणी केली असता पोलीस पथकास मिळालेल्या माहिती प्रमाणे गोदामाजवळ 4 ते 5 ईसम हे चारचाकी वाहन क्र. एम. एच. 34 ए. एम. 8969 या वाहनातून काही बॉक्स काढून गोदामात ठेवतांना दिसून आले. त्यानंतर सदर गोदामाकडे पोलीस पथक येताना दिसून आल्याने काही इसम पळून गेले. परंतू पोलीस पथकास गोदामाच्या आत एक ईसम मिळून आल्याने त्यास पंचासमक्ष त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने आपले नाव सुनिल रामचंद्र जिभकाटे, वय 40 वर्ष, रा. शेगाव टोली आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली असे सांगितले.
यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर चारचाकी वाहनाची व गोदामाची तपासणी केली असता, सदर चारचाकी वाहन व गोदामामध्ये 1) रॉयल स्टॅग डिलक्स विस्की कंपनीचे 01 खरड¬ाच्या बॉक्समध्ये 180 एम.एल. मापाच्या 48 सिलबंद काचेचे बॉटल किंमत 16,800/- रुपये, 2) टायगर ब्रॉन्ड संत्री 5000 विदर्भ डिस्टिलर्स कंपनीचे 26 नग खरड¬ाचे बॉक्स त्यामध्ये 90 मिली मापाच्या देशी संत्री कंपनीच्या सिलबंद प्लास्टिकच्या बॉटल प्रति बॉक्समध्ये 100 नग सिलबंद बॉटल असे एकूण 2600 प्लास्टिकच्या बॉटल व एका खूल्या खरड¬ाचे बॉक्समध्ये 50 नग प्लास्टिकच्या बॉटला किंमत 2,12,000/- रुपये, 3) रॉकेट देशी दारू प्रवरा डिस्टिलरी कंपनिचे 90 मिली मापाचे 44 नग सिलबंद खरड¬ाचे बॉक्स किंमत 3,52,000/- रुपये, 4) रॉयल चॅलेंज प्रिमियम लेजर बियर कंपनीचे 24 नग खरडयाचे बॉक्स 500 मिली मापाचे बियर टिन प्रति बॉक्स 24 नग सिलबंद असे एकूण 360 नग बियर किंमत रु. 1,08,000 रुपये, 5) किंगफिशर स्ट्राँग बियर कंपनीचे 05 नग खरड¬ाचे बॉक्समध्ये 500 मिली मापाचे बियर टिन प्रति बॉक्स 24 नग सिलबंद असे एकूण 120 नग बियर किंमत रु. 36,000 रुपये, 6) लंडन पिलसनर स्टाँग बियर कंपनीचे 01 नग खरडयाचे बॉक्स 500 मिली मापाचे बियर टिन प्रति बॉक्स 24 नग सिलबंद असे एकूण 24 नग बियर किंमत रु. 7,200/- रुपये 7) रॉयल स्टॅग डिलक्स विस्की कंपनीच्या 2 लिटर क्षमतेच्या 09 नग व 29 खरड¬ाच्या बॉक्समध्ये 180 मिली मापाच्या 48 नग सिलबंद बॉटला किंमत रु. 5,18,700/- रुपये, 8) 15-15 लिटर क्षमतेचे 02 प्लास्टीकचे कॅन प्रत्येकी 15 लि. भरलेली हातभट्टी मोहा दारु व 10 लि. क्षमतेच्या कॅनमध्ये 10 लि. हातभट्टी मोहा दारु आणि 100 लि. क्षमतेच्या प्लास्टीकच्या ड्रममध्ये 20 लि. असे एकूण 60 लि. हातभट्टी मोहा दारु किंमत रु. 12,000/- रुपये, 9) रॉकेट देशी दारु संत्रा प्रवरा डिस्टिलरी कंपनीचे 31 नग सिलबंद खरड¬ाचे बॉक्समध्ये 90 मिली मापाच्या प्लास्टिकच्या बॉटला किंमत रु. 2,480 रुपये, व 10) अवैद्यरित्या देशी-विदेशी दारुची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली एक जूनी वापरती मारोती सुझूकी कंपनीची स्विप्ट चारचाकी वाहन क्र. एम. एच. 34 ए. एम. 8969 अंदाजे किंमत रु. 3,00,000/- रुपये असा एकूण 15,65,180 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेला आहे.
संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे आरमोरी येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 215/2026 कलम 65 (अ), 65 (ई), 98, 83 म.दा.का. अन्वये आरोपी नामे 1) सुनिल जिभकाटे रा. शेगाव टोली आरमोरी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, 2) अजय दादाजी राऊत, वय 40 वर्षे, रा. अंतरजी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, 3) राहुल राऊत, वय 35 वर्षे, रा. रामाळा, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, 4) अजय राऊत, वय 30 वर्षे, रा. रामाळा, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, 5) सुभाष तुलावी, वय 28 वर्षे, रा. दंवडी, ता. धानोरा, जि. गडचिरोली यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना मा. न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने सर्व आरोपींना 01 दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे, पोस्टे आरमोरी हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी.जे., सहायक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोनि. कैलास गवते, पोउपनि. संतोष कडाळे, पोउपनि. नरेश सहारे, पोहवा/पिल्लेवान, वालदे, पोअं/कुमोटी, रामटेक, आभारे, सराटे, चापोअं/विस्कडे यांनी पार पाडली.






