Home Breaking News एटापल्ली तालुक्यातील जाबिंया-गट्टा परिसरात पोलीस -नक्षल चकमक.

एटापल्ली तालुक्यातील जाबिंया-गट्टा परिसरात पोलीस -नक्षल चकमक.

705

एटापल्ली तालुक्यातील जाबिंया-गट्टा परिसरात
पोलीस -नक्षल चकमक.

दोन नक्षलवादी ठार

गडचिरोली-
एटापल्ली तालुक्यातील जाबिंया गट्टा जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात पोलीस जवानांना यश आले.

नक्षलविरोधी पथक जाबींया गट्टा परिसरात शोध मोहीम राबवित असताना आज पहाटेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षली व पोलिसांची जोरदार चकमक झाली.यात दोन नक्षलीं ठार झाले. मृत नक्षलींची नावे अद्यापपर्यंत कळू शकले नाही. ही शोधमोहीम अजूनही सुरू असल्याचे पोलीस अधिक्षकाकडून सांगण्यात आले.

जाबींया गट्टा पोलीस ठाण्यावर नक्षल्यांनी मागच्या आठवड्यात गोळीबार केला होता त्या पार्श्वभूमीवर ही शोधमोहीम राबविण्यात येत होती.

नक्षल्यांनी 25 तारखेला आलापल्ली भामरागड मार्गावर रस्ता बांधकामावरील वाहने जाळली होती.आणि 26 एप्रिल बंद चे आवाहन केले. त्यामुळे दक्षिण गडचिरोलीत दहशतीचे वातावरण पसरले होते.
आता पोलिसांना दोन नक्षलींना ठार करण्यात यश आले असून या घटनेने पोलीस दलाचे मनोबल उंचावले आहे.

Don`t copy text!