Home कोरोना लॉकडाऊन चे नियम मोडून विवाह करणाऱ्या शहरातील वधु पित्यावर 50 हजार रुपये...

लॉकडाऊन चे नियम मोडून विवाह करणाऱ्या शहरातील वधु पित्यावर 50 हजार रुपये दंड

420

आरमोरी :- आरमोरी शहरात विवाह सोहळ्यात 200 पेक्षा जास्त लोकं आढळल्याने नगरपरिषद व तहसील कार्यालयाच्या वतीने संयुक्त कारवाई करत 50000 दंड दिनांक 20 मे 2021 ला बसवण्यात आला..
सविस्तर वृत्त आरमोरी ,दिनांक 20 मे 2021 ला श्री. संतोष सिंग रणजीत सिंग जुनी राहणार आरमोरी .यांच्या मुलीचा विवाहा समयी 200 पेक्षा जास्त लोक असल्याची माहिती मिळताच नगरपरिषद व तहसील कार्यालय आरमोरी यांच्या संयुक्त कार्यवाहीत मोका चौकशी करताना 200 पेक्षा जास्त लोक निदर्शनास आले.
श्री संतोष सिंग जुनी यांच्यावर लोकडाऊन चे नियम मोडून विवाह करत असल्याने 50000 दंड बसविण्यात आला. या कार्यवाहीत संजय राठोड नायाब तहसीलदार डॉक्टर माधुरी सलामे मुख्याधिकारी, श्री .नितीन बोरखेडे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता श्री. पी.जी गजभिये तलाठी इत्यादींच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली..

Don`t copy text!