Home कोरोना भोजन, चहा व नास्ता वितरणासह केली परिसराची स्वच्छता

भोजन, चहा व नास्ता वितरणासह केली परिसराची स्वच्छता

151

युवक काँग्रेसचा अभिनव उपक्रम

गडचिरोली : मागील 29 दिवसापासून गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना सकाळ, संध्याकाळ भोजन व्यवस्था व दुपारी चाय बिस्कीट व्यवस्था करण्यात येत आहे. भोजनाची खाली पॅकेट कचरापेटीमध्ये टाकण्यात येत असून नियमितपणे सफाई कर्मचारी ते घेऊन पण जातात. परंतु काल झालेल्या वादळामुळे पूर्ण परिसरात खाली पॅकेट पसरले होते. त्यामुळे आज रविवारी रुग्णालय परिसराची सफाई नगर परिषदेच्या कामगारांना सुट्टी असल्याने केली नाही. परिसरात सर्वत्र कचरा असल्याचे दिसून येताच युवक काँग्रेसने संपूर्ण परिसर स्वच्छ केला. युवक काँग्रेसनी भोजन व्यवस्थेसह नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन युवक कॉंग्रेसने हा अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमात जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, रजनीकांत मोटघरे, तोफिक शेख, गौरव एनप्रेद्दीवार, कुणाल ताजने, संजय चन्ने, रवी गराडे, व्यंकटेश कोडागुळे, राकेश भैसारे, प्रफुल दुर्गे, दिलीप चोधारी,समीर ताजने सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!