Home चंद्रपूर मुल तालुक्यात शिवसेनेचा भगवा ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर फडकला 

मुल तालुक्यात शिवसेनेचा भगवा ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर फडकला 

172

मुल तालुक्यात शिवसेनेचा भगवा ग्रामपंचायत निवडणुकीत अखेर फडकला

मुल – तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत इतिहासात प्रथमच 03 ग्राम पंचायतीवर शिवसेनेने आपले वर्चस्‍व सिध्‍द केले आहे. यात प्रामुख्‍याने नांदगाव06, भवराळा04, सुशि 05,   ग्राम पंचायती शिवसेनेने संपुर्ण पॅनल सहीत ताब्‍यात घेतले आहेत. तर कोसंबी 01,केळझर 02,फिस्कुटी 01, चितेगाव 02 या ग्रामपंचायत मध्ये  उमेदवार निवडून आले .मुल तालुक्यात शिवसेनेने एकुन 62 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे केलेले होते त्यापैकी 21 उमेदवार विजयी होऊन इतिहासात नोंद केली मुल तालुका शिवसेना प्रमुख नितीन  येरोजवार यांच्या नेतृत्वात ही निवडणुक लढण्यात आली होती यामध्ये सतत संपुर्ण उमेदवाराची प्रचाराची जबाबदारी घेऊन संपुर्ण तालुका पिंजून काढुन हे यश संपादन केले . या संपुर्ण विजयात तालुका संघटक सुनिल काळे ,राहुल महाजनवार,अरविंद करपे,आशिष गुंडोजवार,निखिल भोयर,श्रीनिवास कन्नुरवार तथा अन्य शिवसैनिकानी परिश्रम घेतले.

Don`t copy text!