Home गडचिरोली जय सेवा क्रिडा मंडळ चंद्रा यांच्या वतीने भव्य टेनिस बाल व खुले...

जय सेवा क्रिडा मंडळ चंद्रा यांच्या वतीने भव्य टेनिस बाल व खुले कबड्डी स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

100

अहेरी :- तालुक्यातील पेरमिली ग्राम पंचायत येत असलेल्या चंद्रा येते जय सेवा क्रिडा मंडळ यांच्या वतीने भव्य टेनिस बाल व खुले कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
पहिला पारितोषिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून देण्यात येत आहे.
आज सदर स्पर्धेचा उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.तर सहउदघाटक आविस कार्यकर्ता श्रीकांत बंडामवार होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष ग्राम पंचायतचे माजी सरपंच तथा ग्राम पंचायत सदस्य श्री.प्रमोद आत्राम,उपाध्यक्ष म्हणून पेरमिली सरपंचा सौ.किरणताई कोरेत होते प्रमुख अतिथि म्हणून मेडपली सरपंच श्री.निलेश वेलादी,उपसरपंच श्री.सुनील सोयाम,अशिफ खान,वि.सी.कोंडागूर्ले,लक्ष्मण आत्राम,जूलेख शेख,कवीश्वर चंदनखेडे आदि मंचावर होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व गावातील नागरिक उपस्थित होते.

Don`t copy text!