Home गडचिरोली सुधारित निवडणुकीच्या आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमाबाबत

सुधारित निवडणुकीच्या आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमाबाबत

201

गडचिरोली,(जिमाका)दि.19:- सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील नगरपंचायत अहेरी येथील प्रभाग क्रमांक 14, नगरपंचायत सिरोंचा येथील प्रभाग क्रमांक 3,11 व 12, नगरपंचायत चामोर्शी येथील प्रभाग क्रमांक 3,8,10 व 11, नगरपंचायत धानोरा येथील प्रभाग क्रमांक 5, नगरपंचायत,
कुरखेडा येथील प्रभाग क्रमांक 8 व 17 या नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकी संबंधाने ना.मा.प्र. करिता आरक्षित असलेल्या जागा सर्वसाधारण प्रवर्गाच्या होतील, त्या जागापैकी सर्वसाधारण महिलांकरीता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी मा.राज्य निवडणुक आयोगाने दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजी च्या आदेशान्वये सुधारित फेर सोडतीचा कार्यक्रम 2021 जाहिर केला आहे.

गडचिरोली जिल्हयातील खालील नगर पंचायतीच्या समोर दर्शविण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी संवर्गाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली खालील दर्शविलेल्या नगर पंचायतीमधील सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पध्दतीने जागा निश्चित करण्यात येतील.

नगर पंचायत अहेरी, नियंत्रक अधिकाऱ्यांचे नाव अंकीत भाप्रसे सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अहेरी, मुख्याधिकारीचे नाव अजय साळवे, नगर पंचायत अहेरी, आरक्षण व सोडत काढण्याचा दिनांक व वेळ 23 डिसेंबर 2021 (गुरुवार) वेळ स.11.00 वाजता.आरक्षणाच्या सोडतीचे स्थळ – नगर पंचायत अहेरी यांचे सभागूहात

नगर पंचायत सिरोंचा, नियंत्रक अधिकाऱ्यांचे नाव शुभम गुप्ता , भाप्रसे, सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, एटापल्ली, मुख्याधिकारीचे नाव विशाल पाटील, नगर पंचायत, सिरोंचा, आरक्षण व सोडत काढण्याचा दिनांक व वेळ 23 डिसेंबर 2021 (गुरुवार) वेळ स.11.00 वाजता. आरक्षणाच्या सोडतीचे स्थळ – नगरपंचायत कार्यालय, सिरोंचा.

नगर पंचायत चामोर्शी, नियंत्रक अधिकाऱ्यांचे नाव यु.एम.तोडसाम, उपविभागीय अधिकारी चामोर्शी, मुख्याधिकारीचे नाव विशाल वाघ, नगर पंचायत चामोर्शी, आरक्षण व सोडत काढण्याचा दिनांक व वेळ 23 डिसेंबर 2021 (गुरुवार) वेळ स.11.00 वाजता. आरक्षणाच्या सोडतीचे स्थळ – नगर पंचायत चामोर्शी यांचे सभागृहात.

नगर पंचायत धानोरा, नियंत्रक अधिकाऱ्यांचे नाव आशिष येरेकर, भाप्रसे, सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी गडचिरोली , मुख्याधिकारीचे नाव नरेंद्र बेंबरे, नगर पंचायत धानोरा, आरक्षण व सोडत काढण्याचा दिनांक व वेळ 23 डिसेंबर 2021 (गुरुवार) वेळ स.11.00 वाजता. आरक्षणाच्या सोडतीचे स्थळ – नगर पंचायत धानोरा यांचे सभागृहात.

नगर पंचायत कुरखेडा, नियंत्रक अधिकाऱ्यांचे नाव जे.पी.लोंढे, उपविभागीय अधिकारी, देसाईगंज, मुख्याधिकारीचे नाव सोमनाथ माळी, नगर पंचायत कुरखेडा तथा तहसिलदार कुरखेडा, आरक्षण व सोडत काढण्याचा दिनांक व वेळ 23 डिसेंबर 2021 (गुरुवार) वेळ स.11.00 वाजता. आरक्षणाच्या सोडतीचे स्थळ – नगर पंचायत कुरखेडा यांचे सभागृह.

वरील प्रमाणे जागा निश्चित करण्याच्या सोडतीच्या वेळी ज्या नागरीकांना इच्छा असेल त्यांनी आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास आवाहन करण्यात येत आहे. मा.संजय मीणा भाप्रसे, जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Don`t copy text!