9‌ हजारांची लाच स्वीकारतांना सरपंच अडकला एलसीबीच्या जाळ्यात

53

9‌ हजारांची लाच स्वीकारतांना सरपंच अडकला एलसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली जिल्ह्यातील चामोशी तालुक्यातील विक्रमपुर येथील सरपंच घरकुल योजनेत नाव नोंदणी करून घरकुलाचा लाभ मिळवुन देण्याकरीता (9) नवहजाराची लाच स्विकरतांनी एसीबीच्या जाळ्यात अडकला श्रिकांत सत्यनारायण ओल्लारवार (46)रा.चामोर्शी असे सरपंचचे नाव आहे सदर कारवाईने ग्रामपंचायत हादरून गेली.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदाराचे नाव घरकुल योजनेत नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी देण्याकरीता सरपंच श्रिकांत सत्यनारायण ओल्लारवार यांनी 10 हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीच शहानिशा करुन सापळा रचला असता चामोर्शी येथील राहत्या घरी तडजोडीत 9 हजारोंची लाच स्विकरतांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलीस स्टेशन चामोर्शी येथे भ्रष्टचार प्रतिबंध कायद्याच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला .

 

सदर कारवाई ला.प्र.वी.गडचिरोलीचे पो.नि.शि्वाजी रोठोर,पोनि श्रिधर भोसले,पोहवा नथ्थु धोटे, पोना राजेश पदमगिरवार,पोना श्रीनिवास संगोजी,पोशि संदीप उडाव, मपोशि ज्योत्स्ना वसाके, चा पोहा तुळशीराम नवदरे यांनी केली कारवाई