अबनपल्ली गावाच्या पुनर्वसन करण्याची मागणी.

183

अबनपल्ली गावाच्या पुनर्वसन करण्याची मागणी.

माजी जि.प.अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांची तहसीलदार यांना निवेदन..

 

अहेरी:-तालुक्यातील ग्रा.प.व्येँकटरावपेठा अंतर्गत येणाऱ्या अबनपल्ली गाव नदी काठावर वसलेली असून दर वर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे गावातील प्रत्येक घरा मध्ये पाणी घुसून दरवर्षी लाखोचा नुकसान होत असते तसेच त्या वर्षी पूर आल्याने गावकऱ्यांना गाव सोडुन पूर उतरेपर्यंत मुला बाळांना व पाळीव प्राण्यांना घेऊन बाहेर गावी जावून राहावे लागला.म्हणून गावकऱ्यांनी आपल्या गावातील समस्या घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडे गेल्यावर आपण शासनाकडे अबनपल्ली या गावाला पुनर्वसनासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे म्हटले व लगेच निवेदन तयार करून आलेल्या गावकऱ्यांना धरून तहसीलदार साहेबाना निवेदन देण्यात आले.यावेळेस माजी जि. प.सदस्य अजय नैताम,नरेंद्र गर्गम , प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी व संपूर्ण अबनपल्ली गावातील नागरीक उपस्तीत होते..