गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकी चे निकाल जाहीर 

116

गोंडवाना विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकी चे निकाल जाहीर

गडचिरोली,दि.८: गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विविध प्राधिकरणासाठी रविवारी (दि. ४) ला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला बुधवारी सकाळी ७.३० वाजता सुरुवात झाली. अधीसभेच्या ३३ जागांसाठी ८८ उमेदवार , विद्या परिषदेच्या एकूण जागा ८होत्या , तर अभ्यास मंडळ गटाच्या एकूण जागा या ५९ यात होत्या.

 

निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया शासकीय विज्ञान महाविद्यालय विद्यालयात सुरू होती. बुधवारी सकाळपासून सुरू करण्यात आलेली ही प्रक्रिया गुरुवारी संध्याकाळपर्यंत संपली.

 

कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन , संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. अनिल चिताडे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. राजीव वेगींवार, मानवविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. चंद्रमाऊली , डॉ. मनिष उत्तरवार ,डॉ.श्याम खंडारे, डॉ. देव ,डॉ. तारे यांच्या मार्गदर्शनात १०० कर्मचायांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

अधिसभेच्या विद्यापीठ अध्यापक गटातून खुल्या प्रवर्गातून उत्तमचंद कांबळे यांना

१३ मते पडली.ते निवडून आलेत. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. विवेक जोशी होते. त्यांना ११मते पडली. एस. टी. प्रवर्गातून नरेश मडावी, महिला प्रवर्गातून डॉ. रश्मी बंड या आधीच अविरोध निवडून आल्या आहेत.

प्राचार्य गटातील ओ.बी. सी. प्रवर्गातून बुटे शामराव नेमाजी २५ मतांंनी निवडून आले तर सुरेश बाकरे यांना १५ मते पडली.

अनुसूचित जाती प्रवर्गातून चंद्रशेखर कुंभारे २४मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी राजेश दहेगावकर यांना 16 मते पडली आहेत.

खुल्या प्रवर्गातून पाच उमेदवार निवडून द्यायचे होते त्यात लडके लेमराज सदाशिव , संभाजी महादेवराव वरखड कुमार सिंग ,पेद्दी राजू अरुण कुमार आणि एस. आर. सिंग विजयी झाले आहेत .

महाविद्यालय अध्यापक गटात एकुण १० जागा होत्या तर उमेदवार ४२ होते. यातून खुल्या प्रवर्गातून जोगी प्रवीण सुरेश , साबळे संजय नारायणराव ,रूपेंद्र कुमार गौर, वाढवे नथू शंकरराव,हुंगे सुधीर शरदराव तर अनुसूचित जाती प्रवर्गातून भगत मिलिंद बळीरामजी ,अनुसूचित जमाती प्रवर्गातून कन्नाके सतीश गोविंदा, निरधी सूचित जमाती( विमुक्त जाती )किंवा भटक्या जमाती या प्रवर्गातून विवेक संतोषराव गोरलावार ,इतर मागास प्रवर्गातून गोरे संजय भगवंतराव महिला प्रवर्गातून नरवडे शीला उपकार विजयी झाले आहेत.

नोंदणीकृत पदवीधर गटात १० जागा होत्या.यात ३१ उमेदवार उभे होते. यातून अनुसूचित जाती प्रवर्गातून धोपटे दीपक बाबुराव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून आत्राम तनुश्री धर्मराव ,निरधिसूचीत जमाती (विमुक्त जाती) किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून कामडी गुरुदास मंगरूजी ,महिला प्रवर्गातून गजपुरे किरण संजय निवडून आले आहेत.

व्यवस्थापन परिषदेतून ६जागा वर शिवानी विजय वडेट्टीवार, भाग्यश्री हलगेकर ,डॉ. विवेक शिंदे, नितीन पुगलिया, डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, स्वप्निल दोंतुलवार हे यापूर्वीच अविरोध निवडून आलेले आहेत.

विद्या परिषदेत एकूण जागा आठ होत्या .यामध्ये प्रत्येक विद्याशाखेचे प्रतिनिधित्व करणारे दोन अध्यापक निवडून द्यायचे होते. यात आंतर विज्ञानशाखीय अभ्यास गटात खुल्या प्रवर्गातून…..

विज्ञान व तंत्रज्ञान इतर मागास प्रवर्गातून डॉ. विजय वाढई, वाणिज्य व व्यवस्थापन गटात अनुसूचित जमाती प्रवर्गातून डॉ. रवींद्र केवट तर मानव विज्ञान निरधिसूचीत जमाती (विमुक्त जाती ) किंवा भटक्या जमाती या प्रवर्गातून डॉ. तात्याजी गेडाम हे अविरोध निवडून आलेले आहेत.

खुल्या प्रवर्गातून विज्ञान व तंत्रज्ञान कामडी रामदास राजाराम, वाणिज्य व व्यवस्थापन देशमुख जयदेव पुंडलिक, मानव विज्ञान सातपुते नंदाजी राघोबाची विजयी झाले आहेत.