माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडूके काँग्रेस ला राजीनामा देत आदिवासी विद्यार्थी संघटनेत प्रवेश

77

माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडूके काँग्रेस ला राजीनामा देत आदिवासी विद्यार्थी संघटनेत प्रवेश

 

एटापल्ली :- तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके काँग्रेसचे 11 वर्षं तालुकाध्यक्ष पदची जबाबदारी सांभाळल्यानंतर 15 दिवसापूर्वी राजीनामा दिला होता, त्यानंतर काँग्रेस चा प्राथमिक सदस्यचा पण राजीनामा देत. आज शासकीय विश्राम गृह एटापल्ली येथे आदीवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते ताथा माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या उपस्थित शेकडो कार्यकत्यानं सह संजय चरळूके यांनी आविस मध्ये प्रवेश केला. संजय चरडूके हे काँग्रेस पक्षाचे टिकीत वर एक वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले तसेच पंचायत समिती एटापल्ली येथे उपसभापती पदही भूषविले होते, तसेच नगरपंचायत ची सत्ता बसविनामध्ये मोलाचे कामगिरी केले, तालुक्यातील काँग्रेसपक्षाचे अध्यक्ष यांनी आविस मध्ये प्रवेश केल्यामुळे तालुका काँग्रेस ला मोठे खिंडार पडले.यावेळी काँग्रेस चे दिलीप मडावी, माधव गावडे , सुरज कंनाके, सतीश मडावी, गणेश तुमरेटी, सीताराम तलांडे , रामा तलांडे , शंकर तलांडे, महारू उसेंडी अशे शेकडो कार्यकर्ते आविस मध्ये प्रवेश करण्यात आले यावेळी उपस्थित आविस चे माजी जी.प. सद्यस्य कारूजी रापानजी, आविस चे सल्लागार शंकरजी दासारवार , आविस तालुका उपद्याक्ष श्रीकांत जी चिपावार, रमेश जी तोरे माजी प.स. सद्यस्य मणीकंठ गादेवार खयूम भाई शेख ,तसेच दिलीप गंजीवार( माजी सरपंच आलपल्ली) विजय भाऊ कुसनाके ( माजी सरपंच आलपल्ली) जुलेख शेख आविस कार्यकर्ता उपस्थित होते