शिवसेना प्रमुख मा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य सायकल दौड़ स्पर्धा
गडचिरोली:– जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख मा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता सायकल दौड़ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सायकल दौड़ स्पर्धा खुल्या गटात व शालेय गटात घेण्यात येणार आहे स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रवेश निशुल्क राहिल खुल्या गटात प्रथम बक्षीस 5000/ रोख रक्कम व स्मृतिचिन्ह दुतीय बक्षीस 3500/रोख रक्कम व स्मृतिचिन्ह तृतीय बक्षीस 2500/ रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येईल स्पर्धा शिवसेना जिल्हा कार्यालय चामोर्शी रोड़ गडचिरोली ते शिवनी परत शिवसेना कार्यालय चामोर्शी रोड़ गडचिरोली अशी 16 की.मी ची असेल तर शालेय गटात वर्ग 5वी ते 10वी प्रथम बक्षीस 5001/रोख रक्कम व स्मृतिचिन्ह दुतीय बक्षीस 3500/ रोख रक्कम व स्मृतिचिन्ह तृतीय बक्षीस 2500/ रोख रक्कम व स्मृतिचिन्ह ही स्पर्धा शिवसेना कार्यालय चामोर्शी रोड़ गडचिरोली ते वाकडी पर्यंत फक्त 6 कीमी ची असेल सायकल स्वताची आणावी लागेल स्पर्धेत गेरची व रेसिंग ची सायकल चालणार नाही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणी करीता शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार,जिल्हा संघटक विलास कोडाप,उपजिल्हा प्रमुख राजुभाऊ कावळे,वासुदेव शेडमाके,शहर प्रमुख रामकिरित यादव,तालुका प्रमुख गजानन नैताम,ज्ञानेश्वर बगमरे,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे,अमोल मेश्राम,संजय बोबाटे,नीलकंठ मेश्राम, किशोर गेडाम,सुभाष ठाकरे,त्र्यम्बक खरकाटे,गणेश दहलाकर, यांच्याशी संपर्क साधावा व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यानी केले आहे*






