नियतीने सोडला डाव: धाब्यातील दोन मित्रांचा अपघातात मृत्यू
चंद्रपूर:- किरमीरी येथे नातेवाईकाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता.यासाठी धाबा येथील दोन मित्र गेले होते.एक मित्र आधी परतला.सध्या हिवरा-किरमीरी या मुख्य मार्गाचे काम सुरू आहे.याठिकाणी पाईपसाठी गडडा खोदला होता.या ठिकाणी अपघात झाला.दुसरा मित्र थोडा उशीरा परतला.त्याचाही त्याच ठिकाणी अपघात झाला.दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.दोन खास मित्रांवर काळाने डाव साधल्याने गावात शोककळा पसरली आहे.गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा – किरमीरी मार्गावर काल रात्रीच्या सुमारास अपघाताची हि दुर्देवी घटना घडली.
धाबा येथील गोकुळ अंबादास झाडे वय 30 व नितेश गजानन झाडे वय 31 हे दोन खास मित्र.काल किरमीरी या गावात एका नातेवाईकाच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता.या कार्यक्रमासाठी दोघेही आपआपल्या बाईकने तिथे गेले होते.कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महत्वाचे काम आल्याने गोकुळ आपल्या बाईकने गावाकडे परतण्यासाठी निघाला.परत येत असतांना हिवरा किरमीरी मार्गावर असलेल्या खडयात तो पडला.यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यांला तातडीने चंद्रपूरात दाखल करण्यात आले.तिथून नागपूरला रेफर करण्यात आले.मित्राच्या अपघाताची माहिती कळताच नितेश बाईकने परत येत असतांना त्याचाही त्याच खडयात अपघात झाला.त्यालाही चंद्रपूरला भरती करण्यात आले.दरम्यान गोकुळ चा नागपूरात तर नितेशचा चंद्रपूरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.दोन मित्रांचा अशा पध्दतीने मृत्यू झाल्याची माहिती कळताच गावात शोककळा पसरली आहे.
फेबु्रवारी महिन्यात होता विवाह
धाबा येथील जुन्या बेघर वस्तीत हे नितेश व गोकुळ हे दोघेही मित्र वास्तव्यास होते.नितेशचा साक्षगंधाचा कार्यक्रम नुकताच पार पडला होता.फेबु्रवारी महिन्यात त्याचा विवाह होता.पण त्याआधीच काळाने डाव साधला.
कंपनीबाबत रोष
सध्या भंगाराम तळोधी किरमीरी हिवरा या मुख्य मार्गाचे काम सुरू आहे.गुरूबक्षिणी कंपनी हे काम करित आहे.किरमीरी व हिवरा या गावांच्या मधोमध मार्गावर आतून पाईप टाकण्यासाठी खडडा खोदण्यात आला.या खडयाच्या बाजूला काम सुरू आहे असे फलक लावणे आवश्यक होते.पण तिथे कुठलीच सुरक्षाफलक लावण्यात आला नाही.अन यामुळेच दोन तरूणांना आपला जिव गमवावा लागला.यामुळे आता गावकÚयांत कंपनीविषयी कमालीचा रोष निर्माण झाला आहे.
तर ठाण्यासमोर ठिया
कंपनीच्या चुकीमुळे गावातील दोन तरूणांचा जिव गेल्याने गावात संतापाची लाट आहे.याप्रकरणी कंपनीच्या ठेकेदारास तातडीने अटक करावी अशी मागणी गावकरी करित आहेत.असे न झाल्यास दोन्ही तरूणांचे प्रेत पोलीस ठाण्यासमोर ठेउन ठिया आंदोलन करण्याचा इशारा गावकÚयांनीं दिला आहे.दरम्यान कामाच्या ठिकाणी अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच कंपनीकडून सुरक्षाफलक लाउन देखावा निर्माण करण्यात आला.





