*धुळे मनपाच्या समंधीत यंत्रणे कडून विज बिल भरणा न झाल्याने धुळे मिलच्या दगडी चाळीतील सार्वजनिक शौचालयाची विज कट झाली,येथील शौचालय म्हणजे अस्वच्छता व दुर्गंधीचे आगार झाले.*
*वृत्त प्रतिनीधी-: धनंजय गाळणकर*
*धुळे दि.१९ नोहेंबर- शहरातील धुळे टेक्सटाईल मिलच्या दगडी चाळीतील सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीचे धुळे महापालीकेच्या समंधीत यंत्रणेने विज बिल न भरल्याने गेल्या एक महीन्यापासून नमुद शौचालयाचे विज कनेक्षन कट झाले आहे.त्यामुळे सदरच्या शौचालयाची बोरींग बंद झाली आहे, व रात्री याठिकाणी काळाकूट्ट अंधाराचे साम्राज्य असते.तसेच बोरींगचे पानी नसल्याने परिसरातील रहीवाश्यांना घरून डबे भरून शौचास जाण्याची पाळी आली आहे, त्यामुळे सदरच्या शौचालयात अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे.त्यामुळे शौचालयाचा वापर करणाऱ्या रहीवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.तसेच रात्री याठिकाणी काळकुट्ट अंधार होत असल्याने रातअपरात्री शौचाला जाणाऱ्यांची पंचाईत होत आहे.सदर समस्या बाबत मनपाचे आरोग्याधिकारी श्री.राजेंद्र वसावे यांना सामाजिक कार्यकर्ते धनंजय गाळणकर यांनी आठ दिवसात आठ वेळा अवगत केले आहे.परंतू सदर समस्याचे उच्चाटन करण्यास मनपाची आरोग्य यंत्रणा अद्याप लायक ठरलेली नाही.त्यामुळे परिसरातील वयोवृद्ध,अतिवयोवृद्ध,अपंग,महीला,पुरुष व लहान बालक यांना मोठी पंचाईत निर्माण झाली आहे.तरी धुळे मिलच्या दगडी चाळीतील सार्वजनिक शौचालयाचे विज कनेक्षन पुर्ववत जोडण्यात यावे तसेच सदरच्या शौचालयाची नियमीत स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी परिसरातील महीलांनी माध्यमांद्वारे केली आहे.*



