दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाकरिता पुर्व तयारी नियोजन बैठक*

51

*दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाकरिता पुर्व तयारी नियोजन बैठक*

 

*शोधनिबंध पाठवण्याचे आवाहन**

 

गडचिरोली(गो वि)दि:२२

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि जन कल्याणकारी समिती नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या आयोजना बाबत

पूर्वतयारी नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली.

 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ.अनिल चिताडे, संचालक नवोक्रम,नवसंशोधन व साहचर्य डॉ. मनिष उत्तरवार ,डॉ. उल्हास फडके ,मिलिंद जोशी, विनोद वडेट्टीवार जनकल्याणकारी संस्था नागपूरचे पदाधिकारी होते तसेच गणेश परदेशी उपविभागीय अधिकारी,पाठबंधारे विभाग गडचिरोली, प्रा.डॉ.उत्तमचंद कांबळे, प्रा. डॉ.अविनाश भुरसे,कार्यक्रम अधिकारी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र आशिष घराई आदी उपस्थित होते.

२६डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२२ असा दोन दिवसीय हा परिसंवादाचा कार्यक्रम आहे.विषय आहे वैनगंगा नदी खोऱ्यांचा विकास

पुर्व तयारी च्या अनुषंगाने या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

सभेची प्रस्तावना व आभार मानवविद्याशाखाचे अधिष्ठाता डॉ. ए.एस.चंद्रमौली यांनी आभार मानले.

*शोधनिबंध सादरीकरणाचे विषय*

पाणी व्यवस्थापन, जलसंधारण मातीचे पाणी परस्परसंवाद,पाणी साठवण,जलस्रोत वाढवणे,

पाण्याचे पुनर्रअभियांत्रिकीकरण, सिंचन कार्यक्रमाला गती दया,

पारंपारिवर पाणी साठवण रचना, जलादेश क्षेत्र विकास,

जलसिंचन उपक्रम ,पाणी वापरकर्ता संघटना, शासनाची जल धोरणे, पाणलोट व्यवस्थापन

 

शोधनिबंधासाठी हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषांमधील आराखडा स्वीकारला जाईल. पदनाम, विभाग पाणी संस्थेचे नाव, संपर्क क्रमांक आणि ईमेल याचा तपशील लेखकाने दयावा. आराखडा ५०० शब्दांपेक्षा जास्त नसावा. हिंदी आणि मराठी भाषांसाठी युनिकोड किंवा कोकिळा या फॉन्टचा वापर करावा. फॉन्टचा आकार १६ असावा. इंग्रजी भाषेसाठी टाइम्स न्यू आणि रोमन या फॉन्टचा वापर करावा. फॉन्टचा आकार १२ असावा. सर्व भाषांसाठी ओळीतील अंतर १.५ इंच असावे. शोधनिबंधाला शीर्षक दयावे. सोबत आराखडा प्रमुख शब्दांचा परिचय, निबंधाचा विषय, निष्कर्ष आणि संदर्भ जोडावे. नोंदणी आणि आराखडा १५ डिसेंबर २०२२रोजी किंवा त्यापूर्वी स्वीकारला जाईल. शोधनिबंध जमा करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२२ राहील. सहभागी सदस्यांनी “आराखडा” आणि “शोधनिबंध” nasydevwriba@gmail.com या मेलवर पाठवावे. शोधनिबंधाच्या सादरीकरणासाठी प्रत्येकी जास्तीत जास्त १५ मिनिटांचा कालावधी दिला जाईल. सादरीकरण आणि कागदपत्रे ISBN क्रमांक असलेल्या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केली जातील, सहभागी आणि सादरकर्त्यासाठी नोंदणी लिंक: https://forms.gle/xFhAAurvL7SpDrod8 सहभागीसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक: https://chat.whatsapp.com/K/yhig6SmRm29VfdcjAkn ही आहे.