Home गडचिरोली मृत्यूचा सापडा ठरलेल्या ‘त्या’ मार्गाची डागडूजी- पुढाकार घेणा-या राजाराम (खा.) पोलिस अधिका-यांचा...

मृत्यूचा सापडा ठरलेल्या ‘त्या’ मार्गाची डागडूजी- पुढाकार घेणा-या राजाराम (खा.) पोलिस अधिका-यांचा सत्कार

90

मृत्यूचा सापडा ठरलेल्या ‘त्या’ मार्गाची डागडूजी- पुढाकार घेणा-या राजाराम (खा.) पोलिस अधिका-यांचा सत्कार

अहेरी (वा.)

बहुचर्चित आलापल्ली -सिरोंचा महामार्ग मृत्यूचा सापडा ठरत आलेला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब हेरुन राजाराम (खा.) उपपोलिस ठाण्याच्या अधिका-यांनी रस्त्याची डागडूजी करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत चक्क पोलिस अधिका-यांसह जवानांनी रस्त्यावर उतरून खड्डे बुजविण्याचे काम केले. यामुळे या मार्गावरील प्रवास सुकर झाला आहे. पोलिस विभागाच्या या पुढाकाराबद्दल सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात पोलिस अधिका-यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

अहेरी पोलिस उपविभागांतर्गत येत असलेल्या राजाराम खा. उपपोलिस ठाण्यात 2018 रोजी प्रभारी अधिकारी म्हणून रविंद्र भोरे तर पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे रुजू झाले. त्यांनी पदभार स्विकारल्यापासून ठाणे हद्दीत अनेक विकासात्मक व जनजागृतीपर कार्यक्रम पार पार पडले गेले. हद्दी परिसरातील ग्रामीण जिवनपद्धती, मागासलेपणा, अशिक्षितपणा, शासकीय योजनेपासून वंचित, रस्ते, पाणी, आदी समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी नेहमीच पूढाकार घेतला. तसेच पोलिस विभागाच्या दादालोरा खिडकीच्या माध्यमातून हद्दीतील अनेक नागरिकांना दुचाकी परवाना, राशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, तंटे, अनेक रस्ते दुरुस्ती, जनजागृतीपर कार्यक्रम आदींसह विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे. अशातच बहूचर्चित आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरील जीवघणे खड्डंयामुळे अनेक अपघात घडून येत असल्याचे निदर्शनास येताच पोलिस अधिका-यांनी स्वत:हून पुढाकार घेत या महामार्गांवर मुरूम टाकून खड्डे बुजविले.

पोलिस ठाणे हद्दीत पोलिस विभागाद्वारे अनेक गाव विकासात्मक तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबविल्या जात असल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडवार व त्यांच्या चमूद्वारे प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक विजय कोल्हे, पोलिस उपनिरीक्षक सचिन चौधरी यांचांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी श्रीधर द्दुगीरालापाटी, प्रशांत केकरलावार, स्नेहदिप आत्राम, महेश येनमवार, रोशन कंबगौनीवार, श्रीनिवास लेंडगुरे, महेश गादेवार आदी उपस्थित होते.

Don`t copy text!