Home गडचिरोली *महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता २८ जूनला; परीक्षार्थींनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

*महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता २८ जूनला; परीक्षार्थींनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

10

*महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता २८ जूनला; परीक्षार्थींनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. १६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत नीट परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर होणार असल्याने दोन्ही परीक्षांसाठी अनेक केंद्रे एकच येण्याची शक्यता लक्षात घेऊन महाटिईटी परीक्षेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे.

 

सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षार्थींना प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढण्यासाठी दिनांक १६ जून २०२६ ते २८ जून २०२६ हा कालावधी उपलब्ध राहणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक-१ रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.०० या वेळेत होईल. तर पेपर क्रमांक २ याच दिवशी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत घेण्यात येणार आहे.

 

सदर परीक्षेच्या वेळापत्रकात केवळ प्रशासकीय अडचणीमुळे बदल करण्यात आला असून इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परीक्षार्थींनी अद्ययावत माहितीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळास नियमित भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Don`t copy text!