05 वरिष्ठ माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण
. 01 डिव्हीसीएम, 01 पीपीसीएम, 01 एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह 02 सदस्य असे एकूण 05 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकुण 38 लाख रुपयांचे बक्षिस
. गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सन 2025 पासून आतापर्यंत एकूण 137 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, कधीकाळी गडचिरोली जिल्ह्रातील 10 उपविभागात सक्रिय असणारी माओवाद चळवळ आता फक्त भामरागड उपविभागाच्या सिमावर्ती भागातच कैद झालेली आहे. यासोबतच शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमूळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 819 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
आज दिनांक 16/05/2026 रोजी सात जहाल माओवादी नामे 1) मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव बुकलु वेळदा (डिव्हीसीएम- कुतुल एरिया कुरिअर टीम) वय 52 वर्षे, रा. बुर्गी (पि.), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली 2) जिवन ऊर्फ जग्गु ऊर्फ भिमा देवा मडकाम (पीपीसिएम – कंपनी क्र. 07), वय 26 वर्षे, रा. तोयाम, ता. कोंटा जि. सुकमा (छ.ग.), 3) रजनी ऊर्फ दुर्गा ऊर्फ रामोती धुर्वा (एसीएम – नेलणार टेक्नीकल टीम), वय 40 वर्षे, रा. कातुलझोरा, ता. मोहल्ला, जि. मानपुर (छ.ग.), 4) मंगली रघु कुरसाम (सदस्य – कंपनी क्र. 10), वय 22 वर्षे रा. सवनार, ता. उसुर, जि. बिजापुर (छ.ग.), 5) लक्ष्मी डेंगा पुनेम (सदस्य स्टाफ टीम), वय 25 वर्षे, रा. शिकुरभट्टी, ता. बासागुडा, जि. बिजापुर (छ. ग.) यांनी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे.
विशेष म्हणजे दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 रोजी पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण 61 माओवाद्यांनी 54 अग्निशस्त्रांसह मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता. गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली असून भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण 1063 माओवादी सदस्यांनी 637 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.
आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती
1) मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव बुकलु वेळदा
. दलममधील कार्यकाळ
. ऑगस्ट 2001 साली कसनसुर दलममध्ये भरती होवून सन 2002 पर्यंत काम केले.
. सन 2002 साली प्लाटून क्र. 07 मध्ये बदली होऊन सन 2003 पर्यंत काम केले.
. सन 2003 मध्ये प्लाटून क्र. 07 मध्ये एसीएम पदावर पदोन्नती होऊन उपकंमाडर पदावर सन 2006 पर्यंत काम केले.
. सन 2006 साली माड डिव्हीजन मधील कुतुल दलममध्ये बदली होवून सन 2007 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
. सन 2007 साली एसिएम पदावर पदोन्नती होवून कुतुल एरिया येथे सन 2009 पर्यत कुरियरचे काम केले.
. सन 2009 साली डिव्हीसिएम पदावर पदोन्नती होवून कुतुल एरियामध्ये आजपावेतो कुरियरचे काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे
याचेवर दरोड्याचा 01 गुन्हा दाखल असून यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.
2) जिवन ऊर्फ जग्गु ऊर्फ भिमा देवा मडकाम
. दलममधील कार्यकाळ
. सन 2010 साली कोंटा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2011 पर्यंत काम केले.
. सन 2011 साली कंपनी क्र. 01 मध्ये बदली होऊन सन 2014 पर्यंत काम केले.
. सन 2014 साली कंपनी क्र. 05 च्या प्लाटुन क्र. 02 मध्ये बदली होवून डिसेंबर 2016 पर्यंत काम केले.
. सन 2017 साली कंपनी क्र. 07 च्या प्लाटुन क्र. 01 मध्ये बदली होवून सन 2020 पर्यंत काम केले.
. सन 2020 साली कंपनी क्र. 07 मध्ये पिपिसीएम पदावर पदोन्नती होवून आजपावेतो काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे
हिंसक घटनांमध्ये त्याच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच त्याच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.
3) रजनी ऊर्फ दुर्गा ऊर्फ रामोती धुर्वा
. दलममधील कार्यकाळ
. सन 2001 मध्ये टिपगड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2002 पर्यत काम केले.
. सन 2002 मध्ये गट्टा दलम मध्ये बदली होवून 2003 पर्यंत काम केले.
. सन 2003 मध्ये प्लाटुन 07 मध्ये बदली होऊन सन 2004 पर्यंत सदस्य पदावर काम केले.
. सन 2004 साली एसीएम पदावर पदोन्नती होवून सन 2009 पर्यंत काम केले.
. सन 2009 मध्ये नेलणार एरिया टेक्नीकल टीममध्ये बदली होऊन एसीएम पदावर आजपावेतो काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे
हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.
4) मंगली रघु कुरसाम
. दलममधील कार्यकाळ
. सन 2020 साली गंगालुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होवून 01 महिना काम केले.
. सन 2020 साली पिडीया कृषी विभागात बदली होवून सन 2021 पर्यंत काम केले.
. सन 2021 साली डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटीचे गार्ड म्हणुन बदली होवून सन 2024 पर्यत काम केले.
. सन 2024 साली कंपनी क्र. 10 बदली होवून आजपावेतो काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे
हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.
5) लक्ष्मी डेंगा पुनेम
. दलममधील कार्यकाळ
. माहे जानेवारी 2015 साली जगरगुंडा दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे डिसेंबर 2015 पर्यंत काम केले.
. माहे डिसेंबर 2015 साली जगरगुंडा दलममधून पश्चिम ब्युरो स्टॉफ/सप्लाय टीम (गडचिरोली) मध्ये बदली होवून सन 2024 पर्यंत काम केले.
. माहे नोव्हेंबर 2024 साली स्टाफ टीम, नॅशनल पार्क मधील प्लाटून क्र. 32 मध्ये बदली होवून आजपावेतो काम केले.
. सन 2016 मध्ये दक्षिण गडचिरोली येथे बदली होऊन स्टाफ टीममध्ये 2024 पर्यंत काम केले.
. सन 2024 पासुन नॅशनल पार्क येथे बदली होवून स्टाफ टीममध्ये आजपावेतो काम केले.
कार्यकाळात केलेले गुन्हे
हिंसक घटनांमध्ये तिच्या सहभागाबद्दल पडताळणी करणे सुरु आहे. यासोबतच तिच्यावर इतर राज्यांमध्ये दाखल गुन्ह्रांची पडताळणी सुरु आहे.
. शासनाने जाहिर केलेले बक्षीस
. महाराष्ट्र शासनाने मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव बुकलु वेळदा याच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
. महाराष्ट्र शासनाने जिवन ऊर्फ जग्गु ऊर्फ भिमा देवा मडकाम याच्यावर 08 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
. महाराष्ट्र शासनाने रजनी ऊर्फ दुर्गा ऊर्फ रामोती धुर्वा हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
. महाराष्ट्र शासनाने मंगली रघु कुरसाम हिच्यावर04 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
. महाराष्ट्र शासनाने लक्ष्मी डेंगा पुनेम हिच्यावर 04 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस
. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव बुकलु वेळदा याला एकुण 8.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन जिवन ऊर्फ जग्गु ऊर्फ भिमा देवा मडकाम याला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रजनी ऊर्फ दुर्गा ऊर्फ रामोती धुर्वा हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन मंगली रघु कुरसाम हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन लक्ष्मी डेंगा पुनेम हिला एकुण 05 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले माओवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून 1.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
1. मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव बुकलु वेळदा व त्याची पत्नी रजनी ऊर्फ दुर्गा ऊर्फ रामोती धुर्वा
. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गटाने आत्मसमर्पण केल्यास एकत्रित मदत म्हणून एकुण 04 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकूण 171 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी सन 2025 पासून आजपावेतो (आज आत्मसमर्पित झालेल्या 05 माओवाद्यांसहित) एकूण 137 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., व्दितीय कमान अधिकारी 192 बटा. सिआरपीएफ श्री. नरेंद्र कुमार, उपकमांडण्ट इंट सिआरपीएफ श्री. सुमित वर्मा तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घे





